शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; उत्तरपत्रिकांची तपासणी ’ऑन स्क्रीन’ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 19:17 IST

८ एप्रिलपासून पदवी, तर पदव्युत्तरच्या परीक्षा २९ एप्रिल रोजी होणार सुरू

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तरच्या मार्च-एप्रिलच्या परीक्षांना ८ एप्रिलपासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनात परीक्षा विभागाने नियोजन केले आहे. पदवीच्या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्याची आणि ऑनलाइन गुण नोंदणी २४ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान करावी लागणार आहे. त्याशिवाय पदवी अभ्यासक्रमांच्या लेखीपरीक्षांना ८ एप्रिलपासून सुरुवात होणार आहेत. त्याचवेळी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्याची आणि ऑनलाइन गुण नोंदणी १६ ते २६ एप्रिल दरम्यान करावी लागेल. तसेच पदव्युत्तरच्या लेखी परीक्षांना २९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्याची व ऑनलाइन गुण नोंदणी दि. १६ ते ३० एप्रिल यादरम्यान होईल. तसेच लेखीपरीक्षांना ६ मेपासून सुरुवात होणार असल्याचेही संचालक डॉ. भारती गवळी यांनी सांगितले.

उत्तरपत्रिकांची तपासणी ’ऑन स्क्रीन’ होणारविद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या सर्व संलग्नित विधि, औषधीनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी व विज्ञान पदव्युत्तर महाविद्यालयातील परीक्षार्थींना त्यांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन प्रक्रियेद्वारेचे आवेदनपत्र सादर सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी विहित शुल्क भरून विद्यापीठाकडे प्राप्त ऑनलाइन परीक्षार्थींच्या अर्जांची छाननी करून महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये स्कॅन पीडीएफ उत्तरपत्रिका पाठविण्यात येतील. परीक्षार्थींनी त्यांना प्राप्त उत्तरपत्रिकेसंदर्भातील आपले आक्षेप संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्य, संचालकांमार्फत विद्यापीठाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर केल्यानंतर प्राप्त आक्षेपांच्या उत्तरपत्रिका ऑनस्क्रीन पूर्नमूल्यांकन केले जाणार असल्याचेही संचालक डॉ. भारती गवळी यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणexamपरीक्षा