शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

विद्यापीठातील राजकीय अभ्यासक्रमाला विद्यापरिषदेची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 7:29 PM

सर्व तांत्रिक मान्यता पूर्ण झाल्यामुळे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स इन पॉलिटिक्स’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अधिसभेने २० मार्च रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली होती.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स इन पॉलिटिक्स’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अधिसभेने २० मार्च रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली होती. या अभ्यासक्रमास आता विद्यापरिषदेची मंजुरी मिळाली. सर्व तांत्रिक मान्यता पूर्ण झाल्यामुळे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची परिपूर्ण माहिती आणि राजकीय क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी १९५६ साली मुंबईत ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स इन पॉलिटिक्स’ या संस्थेची स्थापना केली. मात्र, संस्थेच्या स्थापनेनंतर काही दिवसांतच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे संस्थेचे काम थांबले. याच धर्तीवर बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात राजकीय प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य एम. ए. वाहूळ यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना दिला होता. तेव्हा कुलगुरूंनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत अभ्यासक्रमाचे स्वागत केले. मात्र, काही दिवसांतच कुलगुरूंनी आपली भूमिका बदलत तत्कालीन पदसिद्ध अधिकाऱ्यांच्या विद्यापरिषदेत हा विषय ठेवून नामंजूर केला होता.

यानंतरही डॉ. वाहूळ व त्यांच्या सहकऱ्यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. २० मार्च रोजी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या बैठकीत डॉ. जितेंद्र देहाडे यांनी राजकीय प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा ठराव मांडला. त्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, अभ्यासक्रमाला मान्यता देण्याचा अधिकार हा विद्यापरिषदेचा आहे. त्यामुळे विद्यापरिषदेच्या मंजुरीशिवाय अभ्यासक्रम सुरू होणे शक्य नव्हते. हा ठराव विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी झालेल्या बैठकीत मांडला. त्यास बहुमताने मंजुरी देण्यात आल्याचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले. एकदा फेटाळलेला प्रस्ताव निर्वाचित सदस्यांच्या विद्यापरिषदेने मंजूर केला आहे.

तात्काळ कामकाज पूर्ण करणारया अभ्यासक्रमाच्या रचनेसाठी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक २७ जून रोजी  झाली. डॉ. देहाडे म्हणाले, विद्यापरिषदेने अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिल्यामुळे सर्व तांत्रिक मान्यतांची पूर्तता झाली आहे. आता समितीकडून आपले कामकाज तात्काळ पूर्ण करून एका ऐतिहासिक अभ्यासक्रमांची पायाभरणी केली जाईल. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रPoliticsराजकारण