शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अनोखी परंपरा! एक असे मंदिर जिथे आद्यपूजेचा मान शनिदेवाला, नंतर गणपतीला अभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 20:09 IST

देशातील एकमेव पैठणमधील शनिगणपती मंदिर, काय आहे आख्यायिका?

छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ‘विघ्नहर्ता’ गणपतीच्या अभिषेकाने होते. मात्र, असे एक मंदिर आहे, जिथे गणाधिपतीच्या ऐवजी आद्यपूजेचा मान शनिदेवाला दिला जातो. म्हणजेच प्रथम शनिदेवाची पूजा व नंतर गणरायाचा अभिषेक केला जातो. देशातील हे एकमेव असे मंदिर आहे, जिथे अशी अनोखी परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जाते.

पैठण येथील ‘शनिगणपती’दक्षिण काशी म्हणून ज्या नगरीचा उल्लेख केला जातो, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण होय. जिथे गोदावरी नदीकडून नाथांच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे. तेच ‘शनिगणपती’ मंदिर.

पहिले शनिदेवाचे दर्शन, मग बाप्पाचेहे अगदी छोटेखानी पश्चिममुखी मंदिर आहे. ते एका ओट्यावर बांधलेलं आहे. मंदिरात सर्वप्रथम काळ्या पाषाणातील शनिदेवाच्या मूर्तीचे दर्शन घडते. या मूर्तीचा आकार दीड फूट आहे. त्यानंतर पाठीमागील बाजूला शेंदूरवर्णीय साडेतीन फूट बाय तीन फूट असलेल्या चतुर्भुज श्रीगणेशाच्या मूर्तीचे दर्शन घडते. मूळ ही मूर्तीही काळ्या पाषाणातीलच आहे, पण शेंदूर लावल्याने ती सिंदूरवर्णीय झाली आहे.

काय आहे आख्यायिका?मंदिराचे पुजारी वे. शा. सं. अविनाश महेशपाठक गुरुजी सांगतात की, प्रत्यक्षात गणपतीलाच साडेसातीची बाधा सुरू होती. त्यावेळी शनिदेवाने साडेसातीमध्ये आद्यपूजेचा मान मला मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली. हा पुराणकथेतला संदर्भ आहे. त्यानुसार पैठणमध्ये शनिगणपतीचे मंदिर उभे राहिले. साडेसातीच्या काळात जीवनाची कठीण परीक्षा घेणारा शनिदेव आणि विघ्नहर्ता या दोन्ही देवता एकाच ठिकाणी विराजमान आहेत. याच मंदिरात आधी शनिदेवाची पूजा, नंतर गणपतीचा अभिषेक केला जातो.

यादवकालीन मंदिरहे देशातील एकमेव मंदिर यादवकालीन असल्याचा पुराणकथेत संदर्भ आढळतो. गोकुळाष्टमीवेळी स्वतः शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज शनिमंदिरात येऊन कुलाचार करत. ही कुलाचाराची परंपरा त्यांचे वंशज गोसावी परिवार आजही पुढे चालवत आहेत.

साडेसातीच्या काळात बाजीराव पेशव्यांनी घेतले दर्शनआयुष्यात एकाही लढाईत न हरलेले बाजीराव पेशवे, त्यांच्या साडेसातीच्या काळात लढाईला सामोरे जात होते. त्यावेळी त्यांनी पैठणला येऊन शनिगणपतीचे दर्शन घेतले आणि नंतर पालखेडची लढाई जिंकली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरspiritualअध्यात्मिक