शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी ! स्वातंत्र्य सैनिकाच्या ८४ वर्षीय विधवेची पेन्शनसाठी दुसरी लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:21 IST

डिसेंबर २०१५ ला कोणतीही  माहिती न देता स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी पेन्शन बंद केली. 

ठळक मुद्देकेंद्राने ३ लाख रुपये  जमा करण्याचे खंडपीठाचे आदेशयाचिकेवर पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.

औरंगाबाद : स्वातंत्र्य सैनिकाच्या ८४ वर्षांच्या विधवेच्या कौटुंबिक पेन्शनपोटी केंद्र शासनाने चार आठवड्यांत ३ लाख रुपये जमा करावेत, असा आदेश न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला. याचिकेवर पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.

गोलटगाव (ता. जि. औरंगाबाद)  येथील स्वातंत्र्य सैनिक अर्जुनराव   साळुंके यांना स्वातंत्र्य सैनिक सन्मान योजनेंतर्गत  राज्य सरकार  आणि केंद्र सरकारमार्फत  स्वातंत्र्य सैनिक पेन्शन मिळत होते.  १९८६-८७  साली अर्जुनराव यांनी त्यांचा   पी.पी.एफ. अर्जावर  वारस म्हणून  द्रौपदाबाई  यांचे नाव घातले होते.  अर्जुनराव हयात असेपर्यंत  त्यांना पेन्शन मिळत होती.  २०१४ साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची पत्नी द्रोपदाबाई यांना नोव्हेंबर २०१५ पर्यंत कौटुंबिक पेन्शन मिळाली;  परंतु डिसेंबर २०१५ ला द्रोपदाबाई यांना कोणतीही  माहिती न देता स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी पेन्शन बंद केली. 

याबाबत बँकेकडे विचारणा केली असता  द्रोपदाबाई यांनी हयात प्रमाणपत्र जमा केले नाही म्हणून पेन्शन बंद केल्याचे बँकेने  सांगितले.आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यानंतरही पेन्शन सुरू न केल्यामुळे द्रोपदाबाई यांनी ॲड. संदीप आंधळे यांच्या मार्फत  याचिका दाखल केली होती. प्राथमिक सुनावणीत  खंडपीठाने  ८४ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला लवकरात लवकर पेन्शन देण्याची उपाययोजना दोन्ही सरकारने एका आठवड्यात  करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती; परंतु त्यानंतरही याचिकाकर्तीला पेन्शन  मिळाली नाही. म्हणून खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ