शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी ! सिंचनपंप सुरु करताना पाय घसरला अन शेतकऱ्याने जीव गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 19:15 IST

विहीरीत जास्त प्रमाणात पाणी असल्याने व पोहता येत नसल्याने मृत्यू झाला.

ठळक मुद्दे विजपंप सुरु करत असताना पाय घसरल्याने ते  विहीरीत कोसळले.

सोयगाव : विद्युतपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (दि.३१) पहाटे घडली. रमेश नारायण महाजन ( ४४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मुखेड शिवारात गट नं.२१ मध्ये रमेश महाजन यांच्या नावे एक हेक्टर शेती आहे. सध्या शेतात मकाची लागवड केली आहे. रमेश महाजन गुरुवारी भल्या पहाटे मका पिकास पाणी देण्याकरीता शेतावर आले. विजपंप सुरु करत असताना पाय घसरल्याने ते  विहीरीत कोसळले. विहीरीत जास्त प्रमाणात पाणी असल्याने व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर त्यांचा पुतण्या दिलीप महाजन शेतात आला. यावेळी त्याला रमेश महाजन विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्याने नातेवाईक आणि पोलिसांना याची माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला. याबाबत सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर गीते, जमादार सुभाष पवार, दिलीप तडवी, विकास दुबेले, श्रीकांत तळेगावकर करत आहेत. मुखेड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, दोन भाऊ व एक बहीण असा परीवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी