शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

बेशिस्त औरंगाबादकर; लाखो रुपयांचा दंड भरू; पण झेब्रा क्रॉसिंगवरच उभे राहू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 13:31 IST

वाहतूक पोलिसांनी वर्षभरात तब्बल जम्पिंग सिग्नल प्रकारात ४५ हजार ५२९ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

- राम शिनगारेऔरंगाबाद : स्मार्ट सिटी म्हणून औरंगाबादचा देशभरात डंका वाजविण्याचे काम करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीमध्ये प्रत्येक गोष्ट स्मार्ट असते; पण औरंगाबाद त्यास अपवाद असल्याचे 'लोकमत'च्या पाहणीत आढळून आले. शहरातील काही अपवाद वगळता बहुतांश रस्ते, सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग आहे, त्या ठिकाणी बेशिस्त औरंगाबादकर नियम पाळत नसल्याचेही दिसून आले.

...अबब! वर्षभरात १ कोटी दंड भरला..शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये वाहतूक पोलिसांनी २०२१ मध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत जम्पिंग सिग्नल प्रकारात तब्बल १ कोटी ३ लाख ५८ हजार ८०० रुपये एवढा दंड भरला आहे. वाहतूक पोलिसांनी वर्षभरात तब्बल जम्पिंग सिग्नल प्रकारात ४५ हजार ५२९ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचवेळी १ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत १८ हजार २२३ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग दिसतच नाहीशहरातील बहुतांश सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेच मारण्यात आलेले नाहीत. पट्टे मारण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची असते. वाहतूक पोलिसांकडून महापालिकेला सतत याविषयी स्मरणपत्रे पाठविण्यात येतात. मात्र स्मार्ट सिटी प्रकल्प राबविणाऱ्या महापालिका प्रशासनाला त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही. क्रांती चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे एका स्वयंसेवी संस्थेने मारले आहेत. त्याशिवाय महावीर चौक, मिल कॉर्नर, कार्तिकी हॉटेल, सेव्हन हिलसह बहुतांश महत्त्वाच्या सिंग्नलच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे दिसून येत नाहीत.

पायी चालणाऱ्यांची अडचणझेब्रा क्रॉसिंग पट्टे नसल्यामुळे पायी चालणाऱ्यांची मोठी अडचण होते. बेशिस्त औरंगाबादकर झेब्रा क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी नियमांचे पालन करीत नाहीत. सिग्नल लागल्यानंतरही गाड्या थांबवत नाहीत. थांबवलीच तर ती पट्ट्यावर उभी असते. याचा सर्वाधिक फटका हा पायी चालणाऱ्या नागरिकांना बसतो.

दंडात्मक कारवाई होईलशहरातील प्रत्येक चौकात, सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग असले पाहिजे, त्यासाठी शहर वाहतूक पोलीस महापालिका प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवतील. तसेच ज्याठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे आहेत, त्याठिकाणी नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जो नियमभंग करेल, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.- विशाल ढुमे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी