शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मुले पळविणारे समजून दोन बहुरूप्यांना जमावाकडून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : चोर समजून आठ दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील चांदगाव येथे गावकऱ्यांच्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची ...

ठळक मुद्देपडेगाव येथील घटना : नागरिकांच्या तावडीतून पोलिसांनी केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चोर समजून आठ दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील चांदगाव येथे गावकऱ्यांच्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात शुक्र वारी सकाळी मुले पळविणारे असल्याचे समजून शेकडो लोकांनी दोन बहुरूप्यांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका करून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.मोहननाथ भैरूनाथ सोडा (३८) आणि विक्रमनाथ लालूनाथ भाटी (३५, दोघे रा. हर्सूल सावंगी, मूळ रा. मध्यप्रदेश), अशी मारहाणीत जखमी झालेल्या बहुरूप्यांची नावे आहेत. यापैकी मोहननाथ यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना अतीव दक्षता कक्षात दाखल करण्यात आले.छावणी पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मुले पळविणारी टोळी आणि चोरटे फिरत असल्याच्या अफवांचे पेव फुटले आहे. त्यामुळे चोर समजून वाटसरूंनाही मारहाण होण्याच्या घटना घडत आहेत. पडेगाव परिसरातील विविध वसाहतींमध्ये गुरुवारी रात्री लहान मुले पळवून नेऊन त्यांची किडनी विकणारे आणि लहान मुलांना कापून त्यांचे काळीज खाणारे लोक फिरत असल्याची अफवा पसरली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी बहुरूपी मोहननाथ आणि विक्रमनाथ हे पडेगाव परिसरातील नवीन वसाहतीत भिक्षा मागण्यासाठी गेले. शरीराने मजबूत आणि डोक्याचेकेस, दाढीचे खुंट वाढलेल्या अवस्थेतील दोघांना पाहून ते मुले पळविणारेच असल्याचा नागरिकांचा समज झाला. त्यांना पाहताच नागरिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. बघता-बघता सुमारे दीडशे ते दोनशे नागरिक जमा झाले आणि त्यांनी दोघांना मारहाण केली.दरम्यान, नागरिकांनी त्यांची चौकशीही सुरू केली. मारहाण होत असताना दोघेही ‘आम्ही बहुरूपी आहोत’, असे ओरडून सांगत होते. मात्र, कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. येईल तो प्रत्येक नागरिक त्यांना एक-दोन फटके देत होता. यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाले.पोलीस धावलेया घटनेची माहिती छावणी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा शेकडो लोकांचे दोन गट मोहननाथ आणि विक्रमनाथला वेगवेगळे घेरून मारहाण करीत होते. या मारहाणीमुळे त्यांच्या अंगावरील कपडे त्यांनी फाडले होते. नागरिकांच्या तावडीतून त्यांची सुटका करून गंभीर जखमी अवस्थेत त्यांना घाटीत दाखल करण्यात आले.