शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताचे निमित्त; लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या तरुणाला जंगलात नेत लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:45 IST

२० हजार रोख रक्कम काढून ऑनलाइन १५ हजार घेतले

छत्रपती संभाजीनगर : स्वत:च्या लग्नाच्या खरेदीसाठी शहरात आलेल्या चाळीसगावच्या मंजूर रंगरेज (२१) याला तिघांनी नगरनाका परिसरातील निर्मनुष्य परिसरात नेत मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील २० हजार रोख व ऑनलाइन १५ हजार रुपये घेऊन पसार झाले. २५ मे रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी तरुणाने बुधवारी तक्रार दिल्यानंतर छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मंजूर मेडिकलमध्ये काम करतो. २५ मे रोजी तो त्याचा मित्र अल्तमश शेख सोबत कारने लग्नाच्या खरेदीसाठी शहरात आला होता. रात्री ७ वाजता पडेगावमधून नगर नाक्याच्या दिशेने येत असताना मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या कारला धडक दिली. त्यामुळे मंजूरने कार थांबवून ट्रिपलसीट दुचाकीस्वारांना (एमएच २० - जीए -३३६४) विचारणा केली. तेव्हा दुचाकीस्वार टवाळखोरांनी मंजूर व त्याच्या मित्रालाच शिवीगाळ करून धमकावले. त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाल्याचा दावा करत मंजूरलाच पैशांची मागणी केली. त्यावर मंजूरने त्याची चूकच नसल्याचे सांगत पैसे देण्यास साफ नकार दिला. तेव्हा त्याने वाद वाढवून पोलिस ठाण्यात चलण्यास सांगितले.

ठाण्याऐवजी जंगलात नेलेतिघांपैकी दोघे मंजूरसोबत कारमध्ये बसले. मात्र, पोलिस ठाण्याऐवजी नगर नाक्यावरून केंद्रीय विद्यालयामागील जंगलात घेऊन गेले. तेथे तिघांनी त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या खिशातील खरेदीसाठी असलेले २० हजार रोख रक्कम काढून घेतली. वर फोनपेवरून १५ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. मंजूर या घटनेमुळे घाबरल्याने गावाकडे निघून गेला. २८ मे रोजी शहरात येत त्याने छावणी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर