शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

स्मार्ट सिटी योजनेतील सुरक्षा प्रकल्प १२० वरून १७८ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:36 IST

८०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर आधुनिक सोयी-सुविधांचा समावेश आहे

ठळक मुद्दे१२० कोटींची निविदा झाली होती प्रसिद्धपाच सदस्यीय समिती घेणार तीन दिवसांत निर्णय५० इलेक्ट्रिक बसचा प्रस्ताव

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात ८०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर आधुनिक सोयी-सुविधांचा समावेश असलेला सुरक्षा प्रकल्प १२० वरून १७८ कोटींवर गेला आहे. ‘एमएसआय’ची (मास्टर सिस्टीम इंटिग्रेटेड) १२० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु या कामासाठी तब्बल १७८ कोटी रुपयांची निविदा दाखल झाली आहे. त्यामुळे ही निविदा मंजूर करायची का, यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने तीन दिवसांत निर्णय घ्यावा, अशी सूचना स्मार्ट सिटीचे मेंटॉर संजय कुमार यांनी केली.

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीस महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, स्वतंत्र संचालक भास्कर मुंढे, सभागृह नेते विकास जैन, विरोधी पक्षनेते जमीर कादरी, भाऊसाहेब जगताप आदी उपस्थित होते. मेंटॉर संजय कुमार मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. त्यात मनपा आयुक्तांनी एमएसआयच्या निविदांची माहिती दिली.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ‘एमएसआय’च्या १२० कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढली होती. यामध्ये तीन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या. यामध्ये सर्वात कमी दराची निविदा म्हणजे १७८ कोटी रुपयांची केईसी इंटरनॅशनल कंपनीची आहे. मूळ अंदाजपत्रकापेक्षा ही निविदा ६० कोटी रुपयांनी जास्त आहे, अशी माहितीही निपुण विनायक यांनी दिली. त्यावर संजय कुमार यांनी निविदेच्या दराविषयी स्मार्ट सिटीची पीएमसी सीएचटूएमच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. सोबतच कंपनीच्या प्रतिनिधींनीही दराविषयीचा खुलासा केला. त्यानंतर संजय कुमार यांनी पाच सदस्यीय समितीने तीन दिवसांत निविदेवर निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. त्यासाठी मनपा आयुक्त, महापौर, पोलीस आयुक्त, सीएचटूएम आणि एनआयसी यांचे प्रतिनिधी या पाच जणांची समिती नियुक्त करण्यात आली.

१०० घरे पर्यावरणपूरकशहरातील १०० घरे पर्यावरणपूरक (इनव्हायर्मेंटल क्लीन) करण्यासंदर्भातही सूचना करण्यात आली आहे. त्यासाठी घरांची निवड केली जाणार आहे. त्याबरोबर रुफ टॉपला भाजीपाला घेणे, रुफ टॉप गार्डन यालाही प्राधान्य देण्याची सूचना संजय कुमार यांनी केली आहे.

२.५० कोटींची एक इलेक्ट्रिक बसबैठकीत सिटी बससेवेबाबत सविस्तर चर्चा झाली. सध्या १०० बसची खरेदी करण्यात आली आहे. आगामी कालावधीत आणखी ५० बस खरेदी केल्या जाणार आहेत. या इलेक्ट्रिक बस असाव्यात, याला प्राधान्य दिले जात आहे. परंतु अशी एक बस २.५० कोटींची आहे. त्यामुळे ही किंमत डिझेल बसपेक्षा किती तरी पट अधिक आहे. त्यामुळे एखादी खाजगी कंपनी प्रतिकिलोमीटर दराने स्वत:च्या इलेक्ट्रिक बस सुरू करण्यास तयार असेल तर त्यासंदर्भात पडताळणी करावी, अशी सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली.

असा आहे ‘एमएसआय’ म्हणजे सुरक्षा प्रकल्प- शहरातील विविध ठिकाणी ८०० सीसीटीव्ही कॅमेरे.- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष- स्मार्ट बस थांबे- ५७ ठिकाणी- डिजिटल डिस्प्ले-११०- सिटी वायफाय - ७००- स्मार्ट पथदिवे- कचरा वाहनांवर जीपीएस 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटीcctvसीसीटीव्ही