शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षापूर्वी जाहीर केलेल्या गुंतवणुकीबाबत अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 19:50 IST

मंदी व जीएसटीमुळे काही उद्योगांनी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करूनही पुढील पाऊल उचलले नसल्याची चर्चा उद्योगवर्तुळात आहे. 

ठळक मुद्दे डीएमआयसी, एमआयडीसीमध्ये मंदी, जीएसटीनंतरची परिस्थिती

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पावणेदोन वर्षापूर्वी दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डीएमआयसीअंतर्गत आॅरिक सिटी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे विविध उद्योगांशी सामंजस्य करार केले. मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्रांतर्गत केलेल्या त्या करारांचे पुढे काय झाले, याबाबत अनिश्चितता आहे. मंदी व जीएसटीमुळे काही उद्योगांनी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करूनही पुढील पाऊल उचलले नसल्याची चर्चा उद्योगवर्तुळात आहे. 

कोट्यवधी रुपये गुंतवणुकीचे अनेक करार विविध उद्योगांसोबत झाल्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, लातूरमध्ये औद्योगिक उलाढालीसह रोजगार निर्मितीला चालना मिळण्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, पुढे या करारांचे काय झाले, गुंंतवणुकीतून उभे राहिलेले उद्योग सुरू झाले की नाही, याची कोणतीही माहिती डीएमआयसी, एमआयडीसीकडे आजघडीला उपलब्ध नाही. हमदर्द, पॅरासन, बीकेटी, सीटीआरसोबतच जालन्यातील स्टील उद्योगांतील गुंंतवणुकीचा समावेश होता. ३१०० जणांना रोजगार देण्याची क्षमता त्या प्रकल्पांत होती. २ लाख ४६ हजार चौ.मी. जागा या उद्योगांना दिल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. लातूरमध्ये १३९ हेक्टर जागा अतिरिक्त एमआयडीसीमध्ये रेल्वे कोच निर्मितीच्या उद्योगासाठी दिली; परंतु त्यातून अजून उत्पादन सुरू झाले नाही. 

अँकर प्रकल्प ह्योसंगही मंदगतीनेकोरियन कंपनी ‘ह्योसंग’ हिने शेंद्र्यामध्ये ३ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे़  आॅरिकसाठी ‘ह्योसंग’ हा अँकर प्रोजेक्ट ठरेल, असे बोलले जात असले तरी या प्रकल्पाची गती अजून मंदच आहे. टेक्सटाईल क्षेत्रातील कोरियन कंपनी ह्योसंगचा १०० एकर जागेत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून एक हजार जणांना रोजगार मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. तसेच ई-व्हेईकल क्षेत्रातील परदेशी कंपनी लोम्बोर्गिनी येथे मोठी गुंतवणूक करणार असल्याचा दावा मध्यंतरी उद्योग खात्याने केला होता.

एमआयडीसीचे मत असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, किती करार झाले, याची माहिती सध्या तरी नाही. माहिती घेऊन नेमके काय झाले हे सांगता येईल.

डीएमआयसीचे मत असेडीएमआयसीचे सहसंचालक गजानन पाटील यांनी सांगितले, डीएमआयसीअंतर्गत आॅरिक सिटीमध्ये ५२ कंपन्यांसोबत एमओयू केले होते. त्यांना जागा दिली आहे. त्या कंपन्या तेथे आल्या आहेत. काही कंपन्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. एमआयडीसीने कुणासोबत करार केले, याबाबत मला सांगता येणार नाही.

टॅग्स :MIDCएमआयडीसीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा