शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अनेक भागात अघोषित भारनियमन; महावितरणचे फोन बंद, सर्वसामान्यांचे कोण ऐकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 20:06 IST

सलग तीन दिवसांपासून सायंकाळी वीज गुल; महावितरणचे अधिकारी उचलेनात फोन

छत्रपती संभाजीनगर : मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. दाद मागण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावले तर ते फोन उचलत नाहीत. सर्वसामान्यांचे कोण ऐकणार ? नेमकी सायंकाळी वीज गुल होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सलग तीन दिवसांपासून सायंकाळी वीज गुलशहरातील रोशन गेट, किराडपुरा, बारी कॉलनी, रहमानिया कॉलनी, रहिमनगर या भागात गुरुवार, शुक्रवार व शनिवारी सलग तीन दिवस सायंकाळी ६:३० ते रात्री ८ वाजेदरम्यान विद्युतपुरवठा खंडित होत आहे. त्याचा येथील व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय सातारा परिसर, देवळाई परिसर, जाधववाडी, चिकलठाणा, छावणी, हिमायतबाग, बायजीपुरा, हर्सूल शहरातील काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. विद्युतपुरवठा कधी खंडित होईल याचा नेम नाही.

कोणीच फोन घेत नाहीमहावितरणची सेवाही अत्यावश्यक सेवेत येते. यामुळे अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना २४ तास अलर्ट मोडवर रहावे लागते. विद्युतपुरवठा खंडित होतो त्याचवेळी नागरिक फोन करीत असतात. जेव्हा फ्यूज कॉल सेंटरमध्ये कोणी फोन उचलत नाही त्यावेळेस नागरिक अधिकाऱ्यांना फोन लावतात; पण अधिकारी फोन उचलत नाहीत. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांना फोन लावला असता त्यांनी तो कॉल उचलला नाही.

भारनियमनाची आधी सूचना देणे आवश्यकविजेची मागणी वाढल्यावर व त्या तुलनेत पुरवठा कमी असल्यावर भारनियमन केले जाते; मात्र महावितरणची जबाबदारी आहे की त्यांनी भारनियमन करण्याआधी ग्राहकांना सूचना देणे आवश्यक आहे; पण महावितरण आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून आले आहे. शहरात शक्यतो भारनियमन करू नाही. भारनियमनाआधी सूचना देणे व सायंकाळी भारनियमन न करता दुपारी किंवा सकाळी करावे.- रहिम खान, रहिवासी, किराडपुरा

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज