शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
3
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
5
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
6
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
7
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
8
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
9
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
10
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
11
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
12
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
13
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
14
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
15
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
16
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
17
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
18
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
19
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
20
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

"भद्रामोरुतीचं दर्शन उद्धवजींनी केलं अन् माझं काम झालं..."! तिकीट मिळाल्यानंतर चंद्रकांत खैरेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:14 PM

अखेर आज ठाकरे गटाने थेट 17 जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. शिवेसना ठाकरे गटाच्या उमेदवारांची ही यादी खासदार संजय राऊत यांनी ट्विट केली आहे. यात छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचाही समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून, जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू होत्या. काही जागांवरून मतभेदही होते. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यावरूनही खल सुरू होता. यातच महाविकास आघाडीत 22-16-10 असा फॉर्म्यूला ठरल्याच्या बातम्याही आल्या. मात्र अखेर आज ठाकरे गटाने थेट 17 जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. शिवेसना ठाकरे गटाच्या उमेदवारांची ही यादी खासदार संजय राऊत यांनी ट्विट केली आहे. यात छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचाही समावेश आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) त्यांना सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

खैरे म्हणाले, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्या आशीर्वादाने मला तिकीट मिळाले. संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनिल देसाई आदी सर्वांच्या सहकार्याने मला उमेदवारी मिळाली. मी या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो. उद्धव साहेबांनी न्याय दिला. मी उद्धव ठाकरे यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. कारण ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि मी जिंकणार." तसेच, जनतेचीही मागणी हेती की, कुठल्याही परिस्थितीत चंद्रकांत खैरे यांनाच तिकीट मिळायला हवे आणि तेच निवडून येतील," असेही खेरे यांनी यावेळी सांगितले. ते एबीपी माझ्यासोबत बोलत होते. 

भद्रामोरुतीचं दर्शन उद्धवजींनी केलं अन्...  -यावेळी प्रतिस्पर्धक कोण? कारण यावेळी भाजप सोबत नसणार, यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, "भजप सोबत नसले म्हणून काय झाले? महाविकास आघाडी असेलना. काँग्रेस आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि आम्ही, आम्ही सर्व एकत्र आहोत. तसेच, प्रतिस्पर्धक कोण महायुती की एमआयएम? यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, कुणीही येऊदेत हो, उद्धव ठाकरे जिंदाबाद." याच वेळी, "मी विशेष म्हणजे, भद्रामारुतीचे आभार मानेल, भद्रामोरुतीचं दर्शन माननीय उद्धवजींनी केलं आणि माझं काम झालं," असेही खेरे म्हणाले.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना