शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

"रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू योग्य जागा असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पाठवले होते पत्र"

By बापू सोळुंके | Updated: April 25, 2023 19:59 IST

रत्नागिरी रिफायनरी  प्रकल्पामुळे सुमारे एक ते दिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्याचा जीडीपी साडेआठ टक्क्यांनी वाढणार आहे.

छत्रपती संभाजी नगर: मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प राज्यासाठी खूप महत्वाचा असल्याचे आणि बारसू येथेच या प्रकल्पासाठी  योग्य जागा असल्याचे नमूद केले होते, असा खळबळजनक खुलासा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथे केला. मात्र, आता ते विरोध करत आहेत, अशा नकारात्मक प्रवृत्तीला उद्योजकांनी  मोडीत काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

चिकलठाणा, शेंद्रा एमआयडीसीतील ७० कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्याच्या विकास कामाचे भूमीपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते  मंगळवारी येथे झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयोमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, मसिआ संघटनेचे अध्यक्ष किरण जगताप, माजी उपमहापौर राजू शिंदे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतनकुमार गिरासे, मुख्य अभियंता राजेंद्र केंद्रे, कार्यकारी अभियंता रमेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना उद्योगमंत्री म्हणाले की, राज्यातून उद्योग बाहेर गेले की, पत्रकार परिषदा घेऊन आरोप करणाऱ्यांनी आता हा हा प्रकल्प होऊ नये, म्हणून विरोध सुरू केला. रत्नागिरी रिफायनरी  प्रकल्पामुळे सुमारे एक ते दिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्याचा जीडीपी साडेआठ टक्क्यांनी वाढणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी कसा आवश्यक आणि महत्वाचा आहे, याविषयी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना पंतप्रधांनाना पत्र लिहीले होते. आता तेच राजकारणासाठी या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. ही नकारात्मक प्रवृती मोडीत काढण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामंत यांनी केले. यावेळी पालकमंत्री भुमरे यांनी मनोगत व्यक्त करताना एवढ्या वेगाने काम करणारा उद्योगमंत्री आतापर्यंत पाहिला नसल्याचे नमूद करीत सामंत यांचे कौतुक केले. मंत्री सावे, मसिआचे जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

पुढील २५ वर्ष रस्ते टिकले पाहिजेसहा महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे आलो होतो,तेव्हा रस्त्याच्या विकासासाठी मसिआ संघटनेने ४० कोटी रुपयांची मागणी केली होती. उदय सामंत यांच्या कार्यकाळात ही रस्ते झाले हे लोकांच्या लक्षात राहण्यासाठी ही रस्ते २५ वर्ष टिकतील अशी मजबूत बांधा,असे निर्देश त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. हे काम चांगले करून घेण्याची जबाबदारी मसिआची आहे. यात कुठेही निकृष्ट दर्जा दिसल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी उद्योजकांना सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद