शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धवसेनेने रोखला महावीर चौक; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

By बापू सोळुंके | Updated: June 12, 2025 17:37 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी तसेच महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाचा विसर पडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गुुरुवारी सकाळी  शहरातील महावीर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे. यांतर्गत बुधवारी शहरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आज महावीर चौक(बाबा पेट्रोल पंप )येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. उद्धवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.  शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे...शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळालाच पाहिजे...लबाड सरकार मुर्दाबाद.. आश्वासन देऊन पळ काढणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी काही काळ रस्ता रोखून धरला. यामुळे चौकात आलेली  वाहने काही काळ एकाच ठिकाणी थांबली होती. 

शहरातील मुख्य चौकच अडविल्याने  पोलिसांनी आ.दानवे यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. क्रांती चौक पोलीस स्टेशनात नेल्यानंतर त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या आंदोलनात महानगरप्रमुख राजू वैद्य, अरविंद धिवर, संतोष जेजुरकर, अशोक शिंदे, विजय वाघमारे, संतोष खेंडके, विठ्ठल बदर पाटील, चंद्रकांत गवई, दिग्विजय शेरखाने, वीरभद्र गादगे, सचिन तायडे, संजय मोटे, शंकरराव ठोंबरे, विष्णू जाधव, विशाल खंडागळे, बापू कवळे, जयसिंग होलीये, प्रमोद ठेंगडे, संजय बापू पवार, रवी गायकवाड, रामेश्वर कोरडे, सुनिता आऊलवार, सुनिता देव, दुर्गा भाटी, आशा दातार, सुकन्या भोसले आदींनी सहभाग नोंदविला.

१० कलमी योजना राबवाव्यातमहायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. राज्य सरकारला शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याने लबाड सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात यावा. तसेच विधानसभा निवडणूक दरम्यान आश्वासन दिलेल्या १० कलमी योजना राबविण्यात याव्या, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर यांनी गुलाबी फेटा, धोतर आणि कुर्ता घालून शेतकऱ्यांचा आसूड पुस्तकांचे लेखक व दिवंगत थोर समाजसेवक महात्मा फुले यांच्या पेहरावात या आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन