शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांच्या मुदतीची इंजेक्शन्स तीन महिन्यांतच झाली सदोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:56 IST

घाटी रुग्णालयास काही दिवसांपूर्वीच प्राप्त झालेल्या अ‍ॅसिडीटीवरील इंजेक्शनच्या साठ्यात बुरशीसदृश दोष आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे या इंजेक्शन्सचे तीन महिन्यांपूर्वीच उत्पादन झाले होते. दोन वर्षांच्या मुदतीची ही इंजेक्शन्स अवघ्या तीन महिन्यांतच सदोष झाली आहेत.

ठळक मुद्दे ‘हाफकिन’ ची उत्पादकाला नोटीस : अन्न व औषधी प्रशासनातर्फे होणार नमुने तपासणी

औरंगाबाद : घाटी रुग्णालयास काही दिवसांपूर्वीच प्राप्त झालेल्या अ‍ॅसिडीटीवरील इंजेक्शनच्या साठ्यात बुरशीसदृश दोष आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे या इंजेक्शन्सचे तीन महिन्यांपूर्वीच उत्पादन झाले होते. दोन वर्षांच्या मुदतीची ही इंजेक्शन्स अवघ्या तीन महिन्यांतच सदोष झाली आहेत. त्यामुळे औषधी उत्पादन आणि पुरवठ्यातील बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.घाटी रुग्णालयास २२ नोव्हेंबर रोजी रॅनिटिडीन नावाच्या ८० हजार इंजेक्शनचा पुरवठा झाला होता. हे इंजेक्शन घाटीतील वॉर्डांमध्ये पाठविण्यात आले; परंतु त्यातील इंजेक्शनच्या आरटी १८२४, १८२२, १८२३ आणि १८२६ या चार बॅचमध्ये बुरशीसदृश घाण कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास पडली. हा प्रकार ड्रग्ज स्टोअरच्या प्रमुखांना कळविण्यात आला. खबरदारी म्हणून तातडीने वॉर्डांमधून सर्व साठा काढून घेण्यात आला. चार बॅचमधील एकूण ६० हजार इंजेक्शनचा वापर थांबविण्यात आला आहे. या प्रकारानंतर अन्न व औषधी प्रशासनातर्फे या इंजेक्शनच्या नमुन्याची तपासणी केली जाणार आहे. प्रयोगशाळेतील तपासणी अहवालानंतरच इंजेक्शन्समध्ये नेमका काय दोष होता, हे समोर येणार आहे.तपासणी यंत्रणाच नाहीराज्यभरात ‘हाफकिन’मार्फत औषधींचा पुरवठा होतो. उत्पादनापासून तर पुरवठ्यापर्यंत औषधींची पडताळणीच होत नसल्याचा प्रकार घाटीत आलेल्या सदोष इंजेक्शनमुळे समोर आला. शिवाय घाटीतही औषधी आल्यानंतर थेट वितरित केली जाते. औषधींची कोणत्याही प्रकारे तपासणी होत नाही. त्यामुळे दोषयुक्त इंजेक्शन थेट वॉर्डांपर्यंत गेली. वॉर्डातील कर्मचाºयांमुळे हा प्रकार लक्षात आला. अन्यथा सदोष इंजेक्शन रुग्णांना दिल्या जाण्याचा धोका होता.इंदूर येथे उत्पादनइंदूर येथील नंदिनी फार्मा यांनी जुलै २०१८ मध्ये या इंजेक्शनचे उत्पादन केले आहे. जून २०२० पर्यंत त्यांची मुदत होती. परंतु उत्पादनाच्या तीन महिन्यांत इंजेक्शन्समध्ये दोष आढळला.अहवाल येईलसंबंधित चार बॅचच्या रॅनिटिडीनच्या ६० हजार इंजेक्शनचा वापर थांबविण्यात आला आहे. सदोष इंजेक्शन कोणत्याही रुग्णाला देण्यात आलेले नाही. अन्न व औषधी प्रशासनातर्फे तपासणीसाठी इंजेक्शनचे नमुने घेण्यात आले आहेत. अहवालानंतर नेमका काय दोष आहे, हे निश्चित होईल. ‘हाफकिन’नेदेखील संबंधित उत्पादकाला नोटीस बजावली आहे.-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

टॅग्स :medicineऔषधंAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य