शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव पिकअपची दुचाकीस धडक; दुचाकीचालकाचा पत्नी-मुलांसमोरच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 15:48 IST

या अपघातात पत्नी आणि दोन मुले जखमी आहेत

सिल्लोड/ गोळेगाव : तालुक्यातील जळगाव सिल्लोड रस्त्यावर धोत्रा फाट्या जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या पीकअपने दुचाकीस जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी व दोन मुले असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास झाला. दिलीप उदयभान जाधव ( ४२ वर्ष रा.शेखापुर जि. बुलडाणा)  असे मृताचे नाव आहे. तर रोहन ( १५), चंद्रकला ( ४०) आणि गोपाल (१०) अशी जखमींची नावे आहेत. 

दिलीप जाधव हे दुचाकीवरून ( क्रमांक एम एच २८ बी एच ३७७९) पत्नी आणि दोन मुलांसह उंडणगाव येथील एका नातेवाईकांचे लग्न आटोपून धोत्रा-शिवना मार्गे बुलढाणाकडे जात होते. तर पिकअप रिक्षा (क्रमांक एम एच १७ बी वाय ८८४१)  हा जळगावकडून नाशिककडे जात होता. धोत्रा फाट्याजवळ पिकअप रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दिलीप जाधव यांच्या जागीच मृत्यू झाला. तर पत्नी चंद्रकला मुले रोहन आणि गोपाल हे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच शेतकरी संघटनेचे मुक्ताराम गव्हाणे, संदीप गव्हाणे, गहिनीनाथ बँकेचे चेअरमन पिराजी मुराडे यांनी त्यांच्या वाहनातून जखमींनाउपचारासाठी  सिल्लोड येथे रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती अजिंठा पोलिसांना देण्यात आली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भिंगारे, फौजदार राजू राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहन जाधव हा गंभीर असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद