शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तडा गेलेल्या रुळावरून दोन रेल्वे गेल्या; वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, प्रवासी बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 11:31 IST

जोडावरची वेल्डिंग तुटल्यामुळे घडली घटना, तातडीने तासाभरात दुरुस्ती करण्यात आली

औरंगाबाद : मुख्य रेल्वेस्थानकातून मुकुंदवाडीच्या दिशेने जाणारी रेल्वे राजनगर येथील तडा गेलेल्या रुळावर गेल्याचा प्रकार सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर तात्काळ दुरुस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात पुन्हा वेल्डिंगचा मजबुत जोड दिला. तसेच निखळलेल्या क्लिपा जोडल्या. या घटनेत रुळावरुन जाणाऱ्या रेल्वेची गती आवघ्या २० वर होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून रेल्वे प्रवासी बालंबाल बचावल्याचे पुढे आले आहे.

उन्हाळ्यामध्ये रेल्वेचे रुळ हे प्रसरण पावत असतात. त्यांची लांबी-रुंदी वाढत असते. हे सर्व उन्हामुळे घडते. गरम झालेल्या पटरीवरुन वजनदार रेल्वे गेल्यामुळे हा प्रकार होतो. पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर रेल्वे पटरीच्या खाली असलेला पायटा माती दबल्यास त्याठिकाणी पम्पिंग होते. अशा ठिकाणाहुन रेल्वे गेल्यामुळे रुळाच्या मध्यभागालाही क्रॅक जाण्याची शक्यता अधिक असते. त्याच पद्धतीचा प्रकार रविवारी सकाळी मुकुंदवडी ते चिकलठाणा रेल्वेस्थानकादरम्यान राजनगर येथे घटना घडली.

जनशताब्दी एक्सप्रेस रुळावरुन गेल्यानंतर त्या गाडीच्या चालकाला रुळावर मोठा आवाज झाल्याचे कळले. त्यामुळे त्या चालकांने तात्काळ माहिती रेल्वे विभागाला कळविली. या रेल्वेच्या नंतर आलेली मराठवाडा एक्सप्रेस गाडीही क्रॅक गेलेल्या रुळावरुनच गेली. या गाडीचा वेग अतिशय कमी होता. त्यामुळे रेल्वे रुळ बाजूला सरकले नाहीत. अन्यथा वेगात गाडी असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी दिली. मराठवाडा एक्सप्रेस गाडी क्रॅक झालेल्या रुळावरुन गेल्यानंतर रेल्वेच्या अभियंत्रिकी विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. या पथकाने सुरुवातीला क्लॅम पट्टी लावली. त्यानंतर काही वेळातच रुळाला वेल्डिंगने जोडून घेत दुरुस्ती केली. यानंतर काही वेळातच रुळावरुन रेल्वे गेल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

चालकाने दिली कल्पनाजनशताब्दी एक्सप्रेस गाडी रेल्वे रुळावरुन गेल्यानंतर मोठा आवाज झाल्याची माहिती चालकाने दिल्यामुळे पुढील घटनांची दुर्घटना टळली आहे. हा सर्व प्रकार रेल्वे विभागासाठी रुटीनचाच प्रकार असल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे