शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार एकरच्या भूसंपादनाचे प्रयत्न

By admin | Updated: July 24, 2014 00:12 IST

उस्मानाबाद : उद्योग विकासासाठी जिल्ह्यातील जवळपास २१५६़६ एकर जमीन भूसंपादित करण्यासाठी कौडगाव व इतर पाच ठिकाणी हलचाली सुरू आहेत़

उस्मानाबाद : उद्योग विकासासाठी जिल्ह्यातील जवळपास २१५६़६ एकर जमीन भूसंपादित करण्यासाठी कौडगाव व इतर पाच ठिकाणी हलचाली सुरू आहेत़ यात कौडगावचा पहिला व तिसरा टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आणि प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत़ दरम्यान, संपादित १४१९़२२५ एकरावर सध्या सुरू असलेल्या मोजक्या उद्योगांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उस्मानाबादसह कौडगाव, उमरगा, भूम, कळंब या ठिकाणी ५६७़६९ हेक्टर क्षेत्र एमआयडीसीसाठी संपादित केले आहे़ जमिनीचे संपादन आणि भूखंड वाटप करून अनेक वर्षाचा कालावधी लोटला तरी उस्मानाबाद शहर वगळता इतरत्र मुलभूत सुविधा अद्यापपर्यंत पुरविण्यात आलेल्या नाहीत़ उस्मानाबाद सारख्या डोंगराळ भागात मुख्यत: पाण्याचा प्रश्न बिकट आहे़ असे असतानाही अनेक उद्योजकांनी एमआयडीसीतील भूखंड घेऊन उद्योग उभारले़ मात्र, रस्ता, विजेसह पाण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे़
उस्मानाबाद, उमरगा येथे केवळ दोन कूपनलिका असून, उन्हाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ उद्योजकांवर येते़ उद्योजकांनी बैठकांमध्ये मूलभूत सुविधेबाबतचा प्रश्न छेडल्यानंतर उद्योग किती सुरू आहेत ? त्यातून शासनाला किती उत्पन्न मिळेल ? अगोदर उद्योग सुरू होऊ द्या, असे प्रश्न, उत्तरे ऐकावी लागत आहेत़ एमआयडीसीच्या क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी अतिरिक्त कौडगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक दोनसाठी जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे़ तर अतिरिक्त कौडगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक तीन मध्ये ३६९़४३ हेक्टर जमीन संपादनाची कार्यवाही केली आहे़
शिवाय विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी ७८़१२, चोराखळी येथील औद्योगिक क्षेत्रासाठी २४२़५६ हेक्टर, नळदुर्ग एमआयडीसीसाठी २४ हेक्टर, वडगाव सिध्देश्वर औद्योगिक क्षेत्रासाठी १४८़५३ हेक्टर तर तेरखेडा औद्योगिक क्षेत्रासाठी ५५़७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ मात्र, शेतकऱ्यांचा विरोध, न्याय खटले आणि लाल फितीच्या कारभारामुळे ही प्रकरणे रेंगाळली आहेत़
शेतकऱ्यांचा विरोध
उस्मानाबाद विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण, चोराखळी औद्योगिक क्षेत्र, नळदुर्ग एमआयडीसीतील जमीन संपादन, एकत्रित मोजणीसाठी काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे़ चोराखळी औद्योगिक क्षेत्रातील भूसंपादन प्रकरण न्यायप्रविष्ट आहे़ वडगाव सिध्देश्वर येथील जमीन संपादनात मावेजाबाबतचा प्रश्न कायम आहे़ तर तेरखेडा येथील भूसंपादनही लालफितीत अडकले आहे़