शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये चरस घेऊन जाणारे दोन तस्कर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 15:04 IST

दोन महिन्यापूर्वी कोकणवाडी येथे मॅफेड्रोनची कारमधून तस्करी करणाऱ्या आरोपींना विशेष पथकाने पकडले होते.

ठळक मुद्देआरोपीकडे पिशवीत १३१ . ६० मिली ग्रॅम चरसच्या १९५  गोळ्या आढळल्या.

औरंगाबाद : चरसच्या गोळ्या घेऊन जाणाऱ्या दोन तस्करांना  मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून चरसच्या तब्बल १९५ गोळ्या, दुचाकी, मोबाईल आणि दोन चिलीम असा सुमारे १ लाख ५ हजाराचा माल जप्त केला.

दोन महिन्यापूर्वी कोकणवाडी येथे मॅफेड्रोनची कारमधून तस्करी करणाऱ्या आरोपींना विशेष पथकाने पकडले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना  पोलीस आयुक्त डॉ.  निखील गुप्ता यांना ही माहिती मिळाली.  पोलिसांनी शहीद भगतसिंग चौकात सापळा रचून संशयित दुचाकीस्वार आरोपी बाबू खान इसाक खान (५२, रा. उस्मानपुरा) आणि मोहम्मद रशीद मोहम्मद हसन (५४, रा . खुलताबाद) यांना पकडले. 

आरोपीकडे पिशवीत १३१ . ६० मिली ग्रॅम चरसच्या १९५  गोळ्या आढळल्या. या दोन चिलीम आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले. छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, कर्मचारी आर. बी. बनकर, इमरान पठाण, तौसिफ खान, अनिल खरात,  विठ्ठल  आडे, विजय निकम,  परशुराम सोनवणे, सय्यद शकील आणि विनोद पवार यांनी केली.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ