पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार दिनेश अर्जून यादव (रा, भारतनगर, गारखेडा) हे ठेकेदार आहेत, सिडको एन २ . मायानगर येथील सुधीर वराडे हे ६ मार्च रोजी खुलताबादला भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी गेले असता त्यांच्या घरासमोर त्यांची उभी केलेली कार (क्रमांक एमएच२०- एजी २४११) चोरी झाली. या घटनेची माहिती त्यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात जाऊन कळविली. यानंतर कारचा शोध सुरू केला. मात्र कार न सापडल्याने शेवटी त्यांनी मंगळवारी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदिवली. चोरांनी यादव यांची कार चाेरल्यानंतर औरंगपुरा येथील खाद्य तेलाचे दुकान आणि रचनाकार कॉलनीतील औषधी दुकान फोडल्याचे गुन्हे शाखेच्या पोलीस तपासात समोर आल्याचे सूत्राने सांगितले. रचनाकार कॉलनीतील मेडिकल दुकानातील सीसीटीव्हीचे डीव्हीआरही चाेरांनी नेले.
एन २ सिडकोतून कार चोरून फोडली दोन दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:04 IST