शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात गोदावरी पात्रात पोहण्यास गेलेली दोन शाळकरी मुले बुडाली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 14:34 IST

गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरलेली दोन शाळकरी मुले बुडाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील बाबतरा येथे घडली.

वैजापुर : गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरलेली दोन शाळकरी मुले बुडाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील बाबतरा येथे घडली. तुषार सतीश गांगड (१४) व विवेक कालीचरण कुमावत (१५) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. 

तुषार आणि विवेक हे दोघेही बाबतरा येथील रहिवासी असुन पुणतांबा येथे आठवीच्या वर्गात शिकत होते. रविवारी दूपारी कुटुंबियांसोबत गोदावरी नदीत पोहण्याचा आनंद दोघांनी घेतला होता. त्यामुळे त्यांना आज परत नदीत पोहण्याचा मोह अनावर झाला. आज सकाळी तुषार व विवेक या दोघांसोबत सार्थक एकनाथ भवर मुलगाही पोहण्यासाठी गेला होता. पण तो नदी पात्रात उतरला नाही. तुषार आणि विवेक पात्रात उतरले मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघांना पाण्याचा नेमका अंदाज आली नाही. यामुळे दोघेही प्रवाहासोबत वाहून गेले. 

दोघेजण प्रवाहासोबत वाहत जात असल्याचे पाहून सार्थकने तातडीने ग्रामस्थांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिस व महसुल प्रशासनाला दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागिय अधिकारी डॉ. संदिपान सानप, उपविभागिय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, वीरगाव पोलिस ठाण्याचे एपीआय अतुल येरमे व त्यांचे सहकारी व अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असुन ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सकाळी सात वाजेपासुन शोधकार्य सुरु असून घटनास्थळी दोन बोटी दाखल झाल्या आहेत. तसेच २५ ते ३० ग्रामस्थसुद्धा  बुडालेल्या मुलांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादgodavariगोदावरीStudentविद्यार्थी