शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कंपनीच्या दोन बसला आग, एक भस्मसात; सूतगिरणी चौकातील घटना, अफवा टाळण्याचे पोलिसांचे आवाहन

By राम शिनगारे | Updated: April 5, 2023 23:59 IST

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

छत्रपती संभाजीनगर : गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौकात उभ्या असलेल्या कंपनीच्या एका बसला अचानक आग लागली. ही बस जळून खाक झाली. शेजारीच असलेल्या दुसऱ्या बसचाही पाठीमागील भाग जळाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूतगिरणी चौकातील देशी दारूच्या दुकानाजवळ रोडच्या बाजूला राजकुमार यादव यांच्या ट्रान्स्पोर्टमार्फत चितेगाव येथे कामगारांना सोडणाऱ्या बस (एमएच २० - ईजी ९८५१)चे चालक अण्णासाहेब मस्के व बस (एमएच २० - सीटी ९८५१)चे चालक किरण कुमावत यांनी कामगारांना कंपनीतून आणून सोडले. त्यानंतर बस दररोज उभी करण्याच्या ठिकाणी लावून घरी निघून गेले. यातील पहिली बस जास्त जळाली. त्या बसच्या शेजारीच दुसऱ्या बसचा पाठीमागील भागही मोठ्या प्रमाणात जळाला. 

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगरचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पुंडलिकनगरच्या निरीक्षक राजश्री आडे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची गर्दी झाल्यामुळे काही काळ वाहतूकही जाम झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केल्याचे निरीक्षक केंद्रे यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नका -पार्किंगमध्ये लावलेल्या बस जळाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत; पण, त्या मेसेजसोबतच जाळपोळ झाल्याचा चुकीचा मेसेजही फॉरवर्ड करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही सोशल मीडियातील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी केले आहे. चुकीचे मेसेज फॉरवर्ड करताना कोणी आढळल्यास गुन्हे नोंदविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलPoliceपोलिस