शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दोन भरधाव ट्रक समोरासमोर धडकल्या, एक चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 20:50 IST

एका ट्रकची समोरची कँबीन निखळून रोडवर पडली. तर दुसरा ट्रक   रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला.

पैठण - पैठण पाचोड रोडवर आखतवाडा गावाजवळ भरधाव असलेल्या दोन ट्रक समोर समोर धडकून झालेल्या अपघातात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी झाला. अपघातात जखमी झालेल्या दुसऱ्या चालकास पोलिसांनी उपचारासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे. 

पैठण पाचोड रोडवर आखतवाडा गावाजवळ असलेल्या जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या पुलाच्या वळणावर सायंकाळी दोन भरधाव ट्रक समोरासमोर भिडल्या. अपघाताची  भिषणता ईतकी होतीकी, एका ट्रकची समोरची कँबीन निखळून रोडवर पडली. तर दुसरा ट्रक   रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. या अपघातात आयशर ट्रक क्र जीजे १२ बीवाय ०१७८ चा चालक मोहनलाल मिश्रीलाल फुलवारी (३२) रा. भारतनगर गांधीधाम कच्छ गुजरात हा जागीच ठार झाला.   ट्रक क्र. एम एच १६ सीसी ९९२१ चा चालक राजेंद्र रावसाहेब सुळ (२७) रा. खेड ता. कर्जत जी.अहमदनगर हा गंभीर जखमी झाला.

अपघाताची खबर आखतवाड्याचे उपसरपंच विवेक म्हस्के यांनी पैठण पोलिसांना दिली . तातडीने पोलीस निरीक्षक किशोर पवार, फौजदार रामकृष्ण सागडे, सतीश भोसले, सुधीर वाव्हळ, मनोज वैद्य, गोपाळ पाटील, आदींनी घटनास्थळी जाऊन जखमी चालकास उपचारासाठी रूग्णालयात हलवले. अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू