शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जवळ भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:27 IST

भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर औरंगाबादकडे परत येणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव टँकरने चिरडले. या अपघातात दोन दुचाकीस्वार तरुण ठार झाले. हा भीषण अपघात शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पडेगाव रस्त्यावर झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर औरंगाबादकडे परत येणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव टँकरने चिरडले. या अपघातात दोन दुचाकीस्वार तरुण ठार झाले. हा भीषण अपघात शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पडेगाव रस्त्यावर झाला.

बंटी सुभाष शिंदे (१७, रा. विजयनगर) आणि ऋषिकेश अशोक पैठणकर (१६, रा. गुरुदत्तनगर, गारखेडा परिसर) अशी मृतांची नावे आहेत. बंटी आणि ऋषिकेश हे दोघे मित्र असून, ते शनिवारी सायंकाळी खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी मोटारसायकलने गेले होते. दर्शनानंतर दोघे औरंगाबादकडे परतत असताना पडेगावजवळ समोरून आलेल्या हिदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरने त्यांना जोराची धडक दिली. त्यात एक जण टँकरच्या चाकाखाली आला व दुसरा रस्त्यावर फेकल्या गेला. चाकाखालचा मृतदेह काढण्यासाठी पोलिसांना टँकरला जॅक लावावा लागला. छावणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माधव पुरी आणि वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी आणि मृताला तात्काळ मोबाईल व्हॅनमधून घाटीत दाखल केले. अपघात विभागात उपचार सुरू असताना बंटीचा मृत्यू झाला.नगरनाका ते मिटमिटा रस्त्यावर वर्दळ असते. या रस्त्यावर दुभाजक नाही. त्यामुळे वाहनचालक ओव्हरटेक करताना लेन सोडतात व अपघात होतात. दुभाजक टाकणे आवश्यक असल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू