शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

पुंडलिकनगर परिसरात दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:51 PM

शहरातील पुंडलिकनगर परिसरातील भारतनगर आणि पहाडे कॉर्नर येथील दोन विद्यार्थिनींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी समोर आले. यापैकी एक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. दुसरी १६ वर्षीय मुलगी परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून, उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त औरंगाबादेतील चुलत्याच्या घरी आली होती. दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

औरंगाबाद : शहरातील पुंडलिकनगर परिसरातील भारतनगर आणि पहाडे कॉर्नर येथील दोन विद्यार्थिनींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी समोर आले. यापैकी एक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. दुसरी १६ वर्षीय मुलगी परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून, उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त औरंगाबादेतील चुलत्याच्या घरी आली होती. दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची आत्महत्याशहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षातील गौरी सुशील खवसे (२३) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुंडलिकनगर परिसरातील मधुराज अपार्टमेंटमध्ये घडली. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पोलिसांनी सांगितले की, गौरीने नुकतीच अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. गेल्या काही दिवसांपासून मात्र ती भीती वाटते असे घरी सांगत असे. शिवाय तिच्यावर कोणीतरी पाळत ठेवते असे ती म्हणायची. गुरुवारी रात्री तिने नातेवाईकांसोबत जेवण केले आणि खोलीत जाऊन झोपली. रात्री कधी तरी तिने छताच्या लोखंडी हुकाला ओढणी बांधून गळफास घेतला. सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार नजरेस पडल्यानंतर नातेवाईकांनी तिला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी गौरीला तपासून मृत घोषित के ले. सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. फरताळे तपास करीत आहेत.-------------चुलत्याच्या घरी पुतणीची आत्महत्याऔरंगाबाद : गारखेडा परिसरातील भारतनगर येथे चुलत्याच्या घरी आलेल्या पूनम अर्जुन वाघाळे (१६, रा. कोहेगाव, ता. सेलू, जि. परभणी) हिने गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलिसांनी सांगितले की, पूनम ही परभणी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत होती. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये ती १८ मे रोजी भारतनगर येथे तिच्या चुलत्याच्या घरी आली होती. गुरुवारी रात्री जेवण करून पूनम झोपली. रात्री तिने स्वयंपाक खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. सकाळी सात वाजेच्या सुमारास स्वयंपाक खोलीचे दार आतून बंद असल्याने दार तोडण्यात आले तेव्हा पूनमने गळफास घेतल्याचे दिसले. नातेवाईकांनी पूनमला घाटीत दाखल केले. पुंडलिकनगर ठाण्यात याविषयी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी