शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

औरंगाबादेत आतापर्यंत दोन अल्पसंख्याक उमेदवारांना यश; एक शायर तर दूसरा पत्रकार

By मुजीब देवणीकर | Updated: April 25, 2024 18:49 IST

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, माजी मंत्री अब्दुल अजीम यांनाही अपयश

छत्रपती संभाजीनगर : दख्खनचा प्रदेश अशी कधी काळी ओळख असलेल्या मराठवाड्याच्या राजधानीचे शहर म्हणजे औरंगाबाद होय. या जिल्ह्याने आजपर्यंत दोनच अल्पसंख्याक खासदार दिले. १९८० मध्ये विख्यात लेखक, शायर काझी सलीम काँग्रेसच्या तिकिटावर मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. त्यानंतर, अल्पसंख्याक खासदारासाठी या मतदारसंघाला तब्बल ३९ वर्षे वाट पाहावी लागली. २०१९ मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले.

दरम्यानच्या काळात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी १९९९ मध्ये नशीब आजमावले. त्यापूर्वी माजी मंत्री अब्दुल अजीम यांनीही काँग्रेसकडून प्रयत्न केले, पण दोन्ही नेत्यांना यश आले नाही.

१९८० मध्ये काझी सलीम १९६२ ते १९७२ पर्यंत विधान परिषदेत नेतृत्व केलेले प्रख्यात शायर काझी सलीम यांना लोकसभेत पाठविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. १९८० मध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली. नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले सलीम यांनी एकहाती विजय मिळविला. त्यांना तब्बल १ लाख ६९ हजार ७२३, तर त्यांचे प्रतिस्पर्धी डी. एस. पाटील यांना ८५ हजार ९७५ मते पडली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अल्पसंख्याक उमेदवार निवडून आला होता. मतदार काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत होता.

१९८४ मध्ये अल्पसंख्याक उमेदवार, पण... १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री अब्दुल अजीम यांना काँग्रेसने संधी दिली. अजीम यांना मोठ्या मताधिक्याने पराभव पचवावा लागला. कारण शरद पवार यांच्या एस. काँग्रेसचे साहेबराव पाटील डोणगावकर मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. अजीम यांना १ लाख ५३ हजार, तर पाटील यांना तब्बल २ लाख ४६ हजार मते पडली होती.

१९८९ मध्ये मराठा कार्डमागील निवडणुकीचा अनुभव डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने १९८९ मध्ये मराठा उमेदवार म्हणून सुरेश पाटील यांना मैदानात उतरविले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे यांना शिवसेनेने पाठिंबा दर्शविला होता. सावे ३ लाख २२ हजार मते मिळवून विजयी झाले. सुरेश पाटील यांना ३ लाख ४ हजार मते मिळाली. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला शिवसेनेने सुरुंग लावला.

१९९१ पर्यंत सेनेची पाळेमुळे घट्ट १९९१च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोहन देशमुख यांच्यावर डाव खेळला, पण हा प्रयोगही यशस्वी झाला नाही. कारण शिवसेनेने आपली पाळेमुळे अधिक घट्ट केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा सुरू झाला होता. या निवडणुकीतही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मोरेश्वर सावे २ लाख ३५ हजार मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी मोहन देशमुख यांना १ लाख ४५ हजार मते मिळाली होती.

१९९९ मध्ये माजी मुख्यमंत्र्यांची एन्ट्रीमराठवाड्याच्या राजधानीतील मुस्लिम मतांची आकडेवारी लक्षात घेऊन काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनेही आपला उमेदवार बदलत चंद्रकांत खैरे यांना मैदानात उतरविले. अंतुले यांना ३ लाख २५ हजार मतांवर समाधान मानावे लागले.खैरे यांनी ३ लाख ८१ हजार मते मिळवून पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश केला.

२०१९ मध्ये अल्पसंख्याक खासदारमागील दोन दशकांत काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार देण्याची हिंमत दाखविली नाही. २०१४ मध्ये औरंगाबादेत एमआयएमची एन्ट्री झाली होती. आमदार असलेले इम्तियाज जलील यांनी लोकसभेसाठी उडी घेतली. जलील यांना ३ लाख ८९ हजार, तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी खा. चंद्रकांत खैरे यांना ३ लाख ८४ हजार मते मिळाली. ४ हजार ४९२ मतांनी जलील निवडून आले. ३९ वर्षांनंतर जलील यांनी अल्पसंख्याक खासदाराचा अनुशेष भरून काढला.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Imtiaz Jalilइम्तियाज जलील