शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दौलताबादरोडवर कार व ट्रकच्या भीषण अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:11 IST

अपघात एवढा भीषण होता की, कारचे अवशेष १०० फुटापर्यंत विखुरलेले होते.

औरंगाबाद : दौलताबादरोडवर जांभळा गावाजवळ आज सकाळी १० वाजेच्या सुमारास कार व ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात दोनजण जागीच ठार झाले आहेत तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचे अवशेष १०० फुटापर्यंत विखुरलेले होते. तर पन्नास फुट दूर पडलेल्या इंजिनसोबत एकजण मृत अवस्थेत आढळून आला.  

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी तारांगण मिटमिटा येथून जांभळा गावाच्या दिशेने एक कार (MH 20 DF 0295) जात होती. यात चारजण होते. याच दरम्यान समोरून कसाबखेडा येथून एक भरधाव ट्रक ( PB 13AL 7471 ) येत होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात ट्रकने कारला 100 फुटापर्यंत फरफटत नेले. यामुळे १०० फुटापर्यंत कारचे अवशेष विखुरले होते. अपघात एवढा भीषण होता की,कारचे इंजिन पन्नास फुट दूर फेकले गेले होते. या इंजीनासोबत कारमधील एकजणसुद्धा बाहेर फेकला गेला. यात कारमधील दोघे जागीच ठार झाले तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. शेख वाजेद शेख अजगर (36 ) , अब्दुल गाणी अब्दुल समद (34 ) अशी मृतांची नावे असून शेख नासिर शेख बाबू ( 29 ) , शेख अजीम शेख अकबर (30)  हे जखमी आहेत. सर्वजण तारांगण सोसायटीसमोर, मिसबह कॉलोनी येथील रहिवासी आहेत.  

अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक विक्रम वडने यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले. कारचे अवशेष रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. कारमधील चोघे अपघात परिसरात राहणारे असल्याने बघ्यांची मोठ्याप्रमाणावर गर्दी जमली. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली. वाहतूक शाखेचे सहायक उपायुक्त ज्ञानोबा मुंढे, छावणी वाहतूक  निरीक्षक नाथा जाधव, ईल्यास पठाण, जी. एच. राठोड, अनिल राठोड  महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातhighwayमहामार्ग