शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-जीपच्या धडकेत दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:43 IST

फुलंब्री-खुलताबाद रस्त्यावर किनगाव फाट्यानजीक शनिवारी मध्यरात्री हायवा ट्रक व जीपची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. मृत दोघेही तालुक्यातील गणोरी येथील रहिवासी आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : फुलंब्री-खुलताबाद रस्त्यावर किनगाव फाट्यानजीक शनिवारी मध्यरात्री हायवा ट्रक व जीपची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. मृत दोघेही तालुक्यातील गणोरी येथील रहिवासी आहेत.बाबासाहेब आसाराम बोडखे (४०), वैजीनाथ निवृत्ती पेहेरकर (३२, रा. गणोरी), अशी मृतांची नावे आहेत. राहुल बंडू गायकवाड (२७, रा. गणोरी) हा जखमी असून, त्याच्यावर औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गणोरी येथील हे तिघे तरुण शनिवारी रात्री जीपने (क्र. एम.एच.०५ -बीएच -५५५६) वानेगाव येथे लग्न सोहळ्याला गेले होते. लग्न आटोपून परतत असताना किनगाव फाट्यानजीक समोरून येणाऱ्या हायवा ट्रकशी (क्र. एम.एच.२० -इजी-९७५९) जोरदार धडक झाली.अपघात एवढा भीषण होता की, यात जीपचा चुराडा झाला व तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी बाबासाहेब बोडखे याला तपासून मृत घोषित केले, तर काही वेळाने वैजीनाथ पेहेरकर याचाही मृत्यू झाला. जखमी राहुल गायकवाडवर उपचार सुरू आहेत.घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रविवारी गणोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलंब्री पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळपर्यंत या घटनेची नोंद झालेली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस