शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर औरंगाबाद जिल्ह्यात होणार दोन ‘इंटरचेंज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 18:35 IST

केसापुरी-रामपुरी व तुळजापूर-सावंगी असे इंटरचेंज समृद्धी महामार्गात होणार आहेत.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण तुळजापूर-सावंगीतील इंटरचेंजचा आकार केला कमी 

- विकास राऊत 

औरंगाबाद : समृद्धी महामार्गांतर्गत जिल्ह्यात दोन इंटरचेंज होणार आहेत. केसापुरी-रामपुरी व तुळजापूर-सावंगी असे इंटरचेंज समृद्धी महामार्गात होणार आहेत. यातील सावंगी येथील इंटरचेंजचा २०१७ साली ठरविण्यात आलेला आकार कमी करण्यात आला आहे. खर्च जास्त होत असल्यामुळे तेथील आकार कमी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्य महामार्गासाठीचे भूसंपादन संपले आहे. इंटरचेंजसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, त्यासाठीची पहिली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राथमिक आढावा घेण्यात आल्यानंतर भूसपांदन प्रक्रिया सुरू होणार आहे. तुळजापूर-सावंगी येथील इंटरचेंज पूर्ण झाल्यानंतर अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची हर्सूल गावातील वाहतुकीच्या खोळंब्यापासून सुटका होणार आहे. समृद्धी महामार्गातील १० जिल्ह्यांतील २८ हजार १२२ खातेदारांची जमीन या महामार्गासाठी घेण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबादच्या ३ हजार ५६८ खातेदारांचा समावेश आहे. राज्यातील १० जिल्ह्यांतील सर्व मिळून ७ हजार २९० हेक्टर जमीन ताब्यात घेण्याचे लक्ष्य होते. यामध्ये १९.१३ टक्के जमीन आदिवासी विभागातील आहे. ७७.४२ टक्के जमीन इनामी आणि इतर देवस्थानाची आहे. एनए-४४ असलेली ८४.२८ टक्के, तर वन विभागाची ६.५० टक्के जमीनीचा यात समावेश आहे. 

१२८९ कोटींचा दिला मावेजा मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून हा महामार्ग जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ९६४ कोटींचा, तर जालना जिल्ह्यात ३२५ कोटींचा मावेजा जमीन खरेदीतून एमएसआरडीसीने आजवर महसूल विभागाच्या माध्यमातून दिला आहे. यामध्ये इंटरचेंजसाठी जे भूसंपादन होईल, त्याची रक्कम वाढेल.

इंटरचेंजसाठी भूसंपादन अधिसूचना निघालीदुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात महामार्गासाठी भूसंपादन होते. आता इंटरचेंजसाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील सगळे निवाडे पूर्ण झाले असून, जमिनीची ताबा प्रक्रिया संपली आहे. फक्त दोन ते तीन टक्के भूसंपादन बाकी आहे. इंटरचेंज भूसंपादनासाठी पहिली अधिसूचना काढण्यात आली आहे. कार्यालयीन बाबी पूर्ण होताच भूसंपादनाला सुरुवात होईल, असे उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग