शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा बंदुकीने विमानांना दिला जात असे सिग्नल, चिकलठाणा विमानतळावर दोन बंदुकींचे जतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 09:07 IST

Aurangabad : स्वातंत्र्यापूर्वीच १९३६ मध्ये औरंगाबादचे विमानतळ कार्यान्वित झाले होते. त्या वेळी फ्लेअर गन अथवा व्हेरी पिस्टल अशी नावे असलेल्या बंदुकींनी सिग्नल दिला जात असे.

औरंगाबाद : विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी आता आधुनिक सिग्नल यंत्रणेचा वापर केला जातो; परंतु कधी काळी विमानांना सिग्नल देण्यासाठी बंदुकांचा वापर होत होता. या  बंदुकांचा वापर मानवी जीव घेण्यासाठी  केला जात नव्हता, तर विविध रंग हवेत उडवून सिग्नल देण्यासाठीच त्यांचा वापर करण्यात  येत होता. कधी काळी वापरल्या गेलेल्या अशाच दोन बंदुका चिकलठाणा विमानतळावर जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. 

स्वातंत्र्यापूर्वीच १९३६ मध्ये औरंगाबादचे विमानतळ कार्यान्वित झाले होते. त्या वेळी फ्लेअर गन अथवा व्हेरी पिस्टल अशी नावे असलेल्या बंदुकींनी सिग्नल दिला जात असे. ‘व्हेरी पिस्टल’ हे नाव युनायटेड स्टेट्स नेव्हीचे लेफ्टनंट एडवर्ड डब्ल्यू. व्हेरी या शोधकर्त्याच्या नावावरून पडले.  त्यांनी सिंगल ॲक्शन फायरिंग मेकॅनिझमसह मोठ्या कॅलिबर सिंगल शॉट पिस्तूलचा शोध लावला, जे हवेत विशेष फ्लेअर्स उडवू शकतात. संकटात असताना सिग्नल पाठवण्यासाठी आणि स्वत:ची स्थिती सांगण्यासाठी, तसेच मदतीसाठी त्यांचा वापर केला जात असे. लाल, हिरवा आणि पांढरा या तीन रंगांद्वारे सिग्नल देण्यात येत असे. 

योग्य निगा राखून जपला जातोय अमूल्य ठेवा- बंदुकींची निगा राखून हा ठेवा जतन केला जात आहे, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘एटीसी’चे सहायक महाव्यवस्थापक विनायक कटके यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद