शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पडेगावमध्ये दोन गट समाेरासमोर भिडले; लाठ्या, काठ्या अन् दगडांचा वर्षाव

By राम शिनगारे | Updated: January 23, 2024 13:06 IST

पोलिसांची तत्परता : काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण, ६४ जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर : पडेगावातील एका घराच्या समोर चार मुले बसल्याच्या कारणावरून दोन गटांत वादावादी झाली. या वादावादीचे पर्यावसान लाठ्या-काठ्या आणि दगडफेकीमध्ये झाले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. दोन्ही गटांतील ६४ जणांना अटक केल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.

छावणी पोलिस ठाण्यात मोहम्मद जिशान नजर मोहम्मद (रा.मिटमिटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार अल्पवयीन मुले येऊन त्यांच्या घराच्या परिसरात सोमवारी दुपारी बसली. या मुलांना समजावून सांगितले असता, त्यातील एका मुलाने स्वत:च्या आईला बोलावून घेतले. त्या मुलाच्या आईने जिशान यांना मारहाण केली. त्यानंतर, काही वेळातच १०० ते १२५ लोकांचा जमाव चालून आला. या जमावाने लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत दगडफेक केली. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. त्याच वेळी शेख आरेफ शेख उस्मान (रा.कासंबरी दर्गा, पडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावरून वाद आहेत. विरोधी गटाचे लोक रस्त्याने जाण्यापासून अडवणूक करतात. सोमवारी त्याच रस्त्याने जात असताना काहींनी वाद उकरून काढला. त्यानंतर, ४० ते ५० लोकांनी त्यांच्या हातातील लाठ्या-काठ्या, दांडे, लोखंडी रॉड, तलवारी, दगडाने मारहाण केली. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचेही शेख आरेफ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मोहम्मद जिशान नजर मोहम्मद यांच्या तक्रारीवरून २७, तर शेख आरेफ यांच्या तक्रारीवरून ३७ जणांना अटक केल्याची माहिती निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.

शहर पोलिसांची तत्परताशहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असताना पडेगावमध्ये घडलेल्या घटनेची माहिती मिळताच, छावणी ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने, उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे, गणेश केदार, कैलास अन्नलदास यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त महेंद्र देशमुख यांच्यासोबत राखीव पोलिस दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे काही वेळातच परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळविले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद