शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांपैकी दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:48 AM

पैठण तालुक्यातील कुतुबखेडा फाट्यावर दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. तर अन्य तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.

पाचोड : पैठण तालुक्यातील कुतुबखेडा फाट्यावर दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. तर अन्य तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.पकडलेल्या दोघांपैकी एक आरोपी बीड जिल्ह्यातील ‘मोक्का’मधील फरार आरोपी आहे. ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत हे आपल्या सहकाऱ्यांसह पैठण तालुक्यात गस्त घालत होते, तेव्हा त्यांनी ही कारवाई केली. पकडलेल्या दोन आरोपींना पाचोड पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे राजेश उर्फ राजा उर्फ हिंदीवाला (रा. गंगापूर), दिलीप उर्फ ठकसेन भोसले उर्फ मुकेश दिलीप पवार, राजेश उघड्या उर्फ हिंदी पवार उर्फ राजू काळे (रा.गंगापूर) व नितीन मिस्त्रीलाल उर्फ मिस्त्र्या चव्हाण (रा. गेवराई) असे सांगितले. राजेश उर्फ राजा हिंदीवाला याच्यावर गेवराई जि.बीड येथील पोलीस ठाण्यात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असून बीड पोलीस त्याचा मागील दोन वर्षांपासून शोध घेत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुभाष भुजंग, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, गणेश जाधव, रतन वारे, संजय काळे, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, गणेश गांगवे, सागर पाटील, रामेश्वर धापसे, प्रमोद साळवे, राहुल पगारे, लटपटे आदींनी केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी