शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीला कंटाळून मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 20:20 IST

शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली

परभणी/औरंगाबाद : कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून रविवारी मराठवाड्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील अर्जुन रावसाहेब शेटे (५०) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना १२ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली़ 

अर्जुन शेटे यांना दहीखेड शिवारात ३८ आर जमीन आहे. त्यांनी २०१४ मध्ये भारतीय स्टेट बँकेतून ४० हजार रुपये कर्ज घेतले होते़ २०१५ मध्ये या कर्जाचे पुनर्गठण करून परत ४० हजार रुपये उचलले़ २०१६ मध्ये ४० हजार रुपये कर्ज घेतले होते़ एकूण १ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज त्यांच्याकडे होते़ कर्जमाफी योजनेत हे कर्ज माफ झाले नाही़ त्यामुळे शेटे यांना चिंता लागली होती़ या चिंतेतूनच अर्जुन शेटे यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ मुंजा अर्जुन शेटे यांच्या माहितीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात अकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बळीराम जाधव तपास करीत आहेत़ 

आर्थिक विवंचनेतून संपवले पहुरी येथील शेतकऱ्याने जीवन औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील पहुरी येथील सुदाम शांताराम मगर (२४) या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला. ही घटना रविवारी उघडकीस आली. सुदाम मगर यांचेकडे दोन एकर शेती आहे. त्यांच्यावर बँक तसेच खाजगी कर्ज होते. ते फिटत नसल्याने ते तणावात होते. त्यातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी, असा परिवार आहे. सोयगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडा