शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादामुळे दोन भाऊ मुकले आई-वडिलांना; दोघांच्या भांडणाला कंटाळून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 16:15 IST

दोघा मुलांचे भांडण गोरखनाथ व लताबाई यांना सहन होत नव्हते. मुलेही ऐकत नव्हती, त्यामुळे त्यांनी कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.

- बाबासाहेब धुमाळवैजापूर (औरंगाबाद): शेती व संपत्तीचा भावा-भावातील वाद हा सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. मात्र या वादामुळे जन्मदात्या आई-वडिलांची काय अवस्था होत असते, याकडे कोणी लक्ष देत नाहीत. काबाडकष्ट करून जपलेली शेती व संपत्ती व त्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठलेली मुले यामुळे कोंडीत सापडलेल्या खंडाळा येथील वृद्ध दाम्पत्याने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. मुलांच्या शेतीचा वाद कधीतरी थांबेल; परंतु त्यांना पुन्हा कधीही आपले आई-वडील दिसणार नाहीत. ही खंत त्यांना जीवनभर राहील.

खंडाळा येथील गोरखनाथ हरिचंद्र गाडेकर (५७) व त्यांची पत्नी लताबाई (५७) या दाम्पत्याला ज्ञानेश्वर व गणेश ही दोन मुले व दोन मुली आहेत. दोघाही पती, पत्नींनी काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकला. सर्व मुलांचे लग्न झाले. यानंतर दोन्ही मुले वेगळी झाली. गोरखनाथ यांना १८ एकर शेती होती. त्यापैकी सात एकर शेती गणेश व आठ एकर शेती ज्ञानेश्वर यांच्या नावावर वाटणी करून दिली होती. उर्वरित जमीन ही गोरखनाथ यांच्या नावावर होती. गोरखनाथ व लताबाई हे दोघेही लहान मुलगा ज्ञानेश्वरमध्ये राहत होते. ज्ञानेश्वर याने वर्षभरापूर्वी त्यांची आत्या मंदाबाई सुखदेव महालकर यांची सात एकर जमीन विकत घेतली. मात्र ही जमीन गणेश सात ते आठ वर्षांपासून बटाईने करीत होता. येथेच खरी दोघा भावात वादाची ठिणगी पडली होती.

दोघा भावात जमिनीवरून वाद सुरू झाला. यावरून ते नेहमी भांडत असत. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचले होते. या भांडणाचा त्रास मात्र गोरखनाथ व लताबाई यांना होत होता. अनेकवेळा समजावून सांगूनही मुले ऐकत नव्हती. गावात तसेच नातेवाईकांतही आपली बदनामी होत असल्याने गोरखनाथ व लताबाई चिंतेत होते. ज्ञानेश्वरने नवीन घेतलेल्या जमिनीत कांद्याची लागवड केली होती. हे कांदे गणेश हा परस्पर काढून नेत होता. यावरून दोघा भावात वाद होऊन दोन दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी झाली होती. गणेशने काठीने मारहाण करून ज्ञानेश्वरला जखमी केले होते. या प्रकरणी गणेशविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे गोरखनाथ व लताबाई तणावात होते.

साडूला फोनवरून आत्महत्या करीत असल्याचे सांगितलेदोघा मुलांचे भांडण गोरखनाथ व लताबाई यांना सहन होत नव्हते. मुलेही ऐकत नव्हती, त्यामुळे त्यांनी कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दुचाकी काढून दोघांनी गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका गाठले. तेथे चपला काढून त्यावर स्वतःची नावे लिहिली. त्यानंतर गोरखनाथ यांनी खंडाळा येथे राहत असलेल्या त्यांच्या साडूला फोन करून आत्महत्या करीत असल्याचे कळविले. त्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत फोन कट झाला होता. यानंतर दोघांनी गोदावरी पात्रात उडी घेऊन जीवन संपविले. या दोघांवरही शोकाकुल वातावरणात खंडाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद