शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मौजमस्तीसाठी दुचाकी चोरी करणारे दोघे अटकेत; पोलिसांकडून १२ मोटारसायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:35 IST

या चोरट्यांकडून वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ग्रामीण  पोलिसांनी व्यक्त केली.

औरंगाबाद: मौजमस्तीसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने मोठ्या शिताफीने सापळा रचून अटक केली. आरोपींनी विविध ठिकाणी मोटारसायकली चोरल्याची कबुली देत लपवून ठेवलेल्या १२ मोटारसायकली पोलिसांच्या हवाली केल्या. या चोरट्यांकडून वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ग्रामीण  पोलिसांनी व्यक्त केली.

मंगेश भिकनचंद गिरी (  रा. भिव धानोरा, ता. गंगापुर)आणि सुमीत रामचंद्र राजपूत (  रा. सिडको एन-६)असे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी ग्रामीण गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक गुन्हेशाखेचे पथक गंगापुर तालुक्यात गस्तीवर असताना औरंगाबाद शहरातील विविध ठिकाणाहून चोरलेल्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी दोन जण ग्रामीण भागात ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक  डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक डॉ. गणेश गावडे स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक सचिन कापुरे, पोहेकाँ रतन वारे, सुनील खरात. रमेश अपसनवाड आणि रामेश्वर धापसे यांनी दोन्ही संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून पकडले. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी मागील एक वर्षाच्या कालावधीत शहराच्या विविध ठिकाणाहून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

दुचाकी चोरल्यानंतर त्यावर बनावट क्रमांक टाकून त्यांची विक्री करण्यासाठी ग्राहकांचा शोध घेत असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींनी लपवून ठेवलेल्या चोरीच्या विविध कंपन्यांच्या तब्बल १२ मोटारसायकली पोलिसांना काढून दिल्या. या दुचाकींची बाजारातील किंमत सुमारे साडेपाच लाख रुपये असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. याविषयी पोलीस उपनिरीक्षक सचिन कापुरे यांच्या तक्रारीवरून वाहनावर बनावट क्रमांक टाक ल्याप्रकरणी गंगापुर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसtheftचोरी