शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षकांना खेचून आणतात चित्रपटातील ‘टिष्ट्वस्ट अ‍ॅण्ड टर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 20:43 IST

आताचा प्रेक्षक हा चोखंदळ झाला असून त्यांची अभिरुची संपन्न करताना वास्तवाचीही कास धरावी लागते,

ठळक मुद्दे पॉपकॉर्न खात रमत-गमत प्रेक्षक बघत आहेत, तो माझ्या धाटणीचा चित्रपट नाही.

औरंगाबाद : सुरुवात, चित्रपटाची कथा बदलविणारा ‘न्यूक्लिअस पॉइंट’ म्हणजेच मध्य आणि चित्रपटाचा शेवट या तिन्ही गोष्टी उत्तम प्रकारे सांभाळल्या गेल्या पाहिजेत. पॉपकॉर्न खात रमत-गमत प्रेक्षक बघत आहेत, तो माझ्या धाटणीचा चित्रपट नाही. माझ्या चित्रपटातील ‘टिष्ट्वस्ट आणि टर्न’ पे्रक्षकांना खेचून आणतात. आताचा प्रेक्षक हा चोखंदळ झाला असून त्यांची अभिरुची संपन्न करताना वास्तवाचीही कास धरावी लागते, अशा शब्दांत चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

नाथ ग्रुप, एमजीएम आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र औरंगाबादतर्फे आयोजित औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राघवन यांनी आयनॉक्स, प्रोझोन येथे ‘मास्टर क्लास’ घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहायक दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राघवन म्हणाले की, माणसाच्या चंचलपणाला स्थिरता देऊन चित्रपटगृहात प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याचे कसब दिग्दर्शकाला जमले पाहिजे. अर्धवट वाटणाऱ्या घटना एकसंध करून पूर्ण रूपात गोष्ट साकारण्यासाठी दिग्दर्शकाने उत्तम संपादकही असायला हवे.  राघवन यांच्या चित्रपटांमध्ये पुण्याचा संदर्भ आवर्जून येतो, असे का हे सांगताना ते म्हणाले की, पुण्यात वाढल्यामुळे तेथील सौंदर्य कायम भावते. पुण्याचे सौंदर्य लुप्त होण्याआधी ते कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करीत आहे.

गाण्याने खुलतो प्रसंग विजय आनंद यांच्या चित्रपटातून आपल्याला प्रेरणा मिळत असून, जुन्या चित्रपटांशी जुळलेले नातेच मला माझ्या चित्रपटातील काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत करते. चित्रपटात कायम टिष्ट्वस्ट आणि टर्न असणे कंटाळवाणे ठरू शकते. म्हणूनच माझ्या चित्रपटांमध्ये मी संगीताला आवर्जून स्थान देतो.

अभिनेत्री म्हणजे ‘डेकोरेटिव्ह पीस’ नव्हे माझ्या सर्वच चित्रपटांमध्ये ज्या अभिनेत्री आहेत, त्यांच्या पात्रांना विशेष स्थान देण्यात आले आहे. अभिनेत्याभोवती जेवढी कथा फिरते, तेवढीच ती अभिनेत्रीभोवतीपण फिरते. माझ्या चित्रपटात अभिनेत्री केवळ ‘डेकोरेटिव्ह पीस’ म्हणून कधीच नसतात आणि नसाव्यात, असे मला वाटते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcinemaसिनेमाbollywoodबॉलिवूड