आठ दिवसांतच एलईडी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:30 PM2019-04-19T23:30:00+5:302019-04-19T23:32:55+5:30

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविले. मात्र, अनेक एलईडी लाईट ...

Turn off the LED within eight days | आठ दिवसांतच एलईडी बंद

आठ दिवसांतच एलईडी बंद

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वेस्टेशन : ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल


औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविले. मात्र, अनेक एलईडी लाईट अवघ्या आठ ते दहा दिवसांतच बंद पडल्याची ओरड रेल्वे कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
पर्यावरणपूरक उपाय आणि विजेची बचत करण्यासाठी मार्च २०१८ पर्यंत देशातील सगळ्याच रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनातर्फे ऊर्जा बचतीसाठी एलईडी लाईटच्या वापराला प्रोत्साहन दिले गेले. देशभरात परवडणाºया दरात एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात आले. त्यातून विजेची बचत करण्याचे लक्ष्य साध्य केले जात आहे.
रेल्वेनेसुद्धा ऊर्जा बचतीसाठी एलईडी लाईट लावण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद रेल्वेस्टेशनही एलईडी दिव्यांनी प्रकाशित करण्यावर भर दिला गेला. गरजेनुसार सर्वच फलाटांवर एलईडीच्या ट्यूब लावण्यात आल्या. एलईडी ट्यूब लावल्यानंतरही अनेक जागा मोकळ्या राहिल्याने पुरेसा उजेड पडत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फेब्रुवारीत पुन्हा जवळपास ३०० एलईडी ट्यूब बसविण्यात आल्या. औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन एलईडी ट्यूबच्या प्रकाशाने उजळत आहे. मात्र, लावलेले लाईट बंद पडत आहेत. त्यामुळे लाईटच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पाच वर्षांपर्यंत सुरक्षित
फेब्रुवारीत एलईडी ट्यूब बसविण्यात आल्या असून, त्या बंद पडल्यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. सर्व लाईट सुरू आहेत. पाच वर्षांपर्यंत या लाईटला काहीही होत नाही, असे रेल्वेच्या विद्युत अभियंत्यांनी सांगितले.
----------

Web Title: Turn off the LED within eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.