शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्याच्या आयातीमुळे तूर हमीभावापासून वंचित : राजू शेट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 19:35 IST

हमीभाव, बाजार भावातील तफावत केंद्राने थेट द्यावी 

ठळक मुद्देमहाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, अशा मोठ्या अपेक्षा होत्या.

औरंगाबाद : केंद्राच्या चुकीच्या आयात धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कडधान्याची आयात ४६ टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी, बाजारपेठेत हमीभावापेक्षा तूर क्विंटलमागे १५०० रुपये कमी भाव मिळत आहे. ही तफावतीची रक्कम केंद्र सरकारकडून वसूल करण्यात यावी व शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रविवारी येथे केली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पूर्ण बांधणी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत. पूर्वीच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. या अंतर्गत आज औरंगाबादेत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत राजू शेट्टी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने तुरीचा हमीभाव ५८०० रुपये प्रतिक्विंटल ठरविला आहे. मात्र, प्रत्यक्षात अडत बाजारात तूर ४३००  ते ४४०० रुपये क्विंटलने विकत आहे. क्विंटलमागे १५०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कारण केंद्राने १५ लाख टनाहून २३ लाख टनापर्यंत कडधान्याची आयात वाढविली आहे. यामुळे तुरीचे भाव घसरले आहेत. जर आयात झाली नसती तर आज तुरीला क्विंटलमागे ६५०० रुपये भाव मिळाला असता. एकरी ७ क्विंटल तूर उत्पादन होते. शेतकऱ्यांना एकरी १५ हजार ४०० रुपयांचा फटका बसत आहे. तफावतीची रक्कम राज्य शासनाने केंद्र सरकारकडून वसूल करावी व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली.  

महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, अशा मोठ्या अपेक्षा होत्या. मुख्यमंत्री होण्याआधी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन आले होते. शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त होईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते, पण ते आश्वासन हवेतच विरले. तुटपुंजी कर्जमाफी केली त्याचा फक्त प्रत्येक गावातील १० ते १५ टक्के शेतकऱ्यांनाच फायदा झाला. उर्वरित ८५ टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून, सातबारा कोरा करा, यासाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला. २२ फेब्रुवारी रोजी शिर्डीत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. यावेळी सूर्यकांत तुपकरी यांच्यासह कार्यकर्ते हजर होते. 

...तर कापूस उत्पादकांना देऊ साथ राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली की, मराठवाड्यातील कापूस उत्पादक आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत नाहीत. जर कापूस उत्पादक रस्त्यावर उतरले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना साथ देईल.

स्वाभिमानी संघटना मनपा निवडणूक लढविणार राजू शेट्टी यांनी जाहीर केले की, औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना लढविणार आहे. सध्या ६ ते ७ उमेदवार आम्ही उभे करणार आहोत. चांगले उमेदवार भेटले तर आणखी जागा लढवू. पाणी, आरोग्य, शिक्षण, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या मुद्यांकडे आम्ही शहरवासीयांचे लक्ष वेधू, असेही त्यांनी नमूद केले. 

घुसखोरांना हाकलून लावा, या मागणीस पाठिंबा बांगला देश, पाकिस्तानमधून आलेल्या घुसखोरांना हाकलून लावा, या मागणीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. मात्र सीएए, एनआरसीला आमचा पाठिंबा नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणे चुकीचेकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे शेतकरी शेतीमाल विक्री करतात, त्यांना तेथील संचालक मंडळ निवडीचा अधिकार दिला पाहिजे. आधीच्या सरकारने घेतलेला निर्णय महाविकास आघाडीने रद्द केला. शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणे हे चुकीचे आहे, बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे हित जपले जात नसल्याने भाजप सरकारने संचालक मंडळ निवडीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र