शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

कुंभारवाडा नव्हे तुळशीबाग; औरंगाबादमधील ४६ जातिवाचक वसाहतींची नावे बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 13:12 IST

शासनाने महापालिकेमार्फत जातिवाचक वसाहतींच्या नावांची यादी मागवली होती.

औरंगाबाद : शहरातील विविध वसाहतींना जातिवाचक नावे देण्यात आली होती. मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने जातीवर आधारित वसाहतींची नावे कोणती याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. महापालिकेने ५४ वसाहतींना अशी नावे असल्याचे कळविले. त्यांतील ४६ नावे बदलण्याचा निर्णय शुक्रवारी शासनाने घेतला.

गुलमंडी-औरंगपुरा भागातील कुंभारवाड्याचे नाव आता तुळशीबाग राहील. रंगारगल्लीचे नाव हिंगलाजनगर, जोहरीवाड्याचे नाव पारसनगर, भोईवाडा (नागेश्वरवाडी)-गंगापुत्र कॉलनी, पारधीपुरा-जीवकनगर याप्रमाणे ४६ वसाहतींची नावे बदलण्यात आली आहेत.

सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय काढला आहे. जातिवाचक नावांमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन जातीय संघर्ष होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शासनाने महापालिकेमार्फत जातिवाचक वसाहतींच्या नावांची यादी मागवली होती. या यादीनुसार नागरिकांकडून नावे बदलण्याचे प्रस्ताव घेतले. तसेच त्यावरही आक्षेप नोंदविण्यात आले. आक्षेपांची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर ५४ नावांपैकी ४६ वसाहतींची नावे बदलण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

जातिवाचक वसाहतींची बदललेली नावेप्रभाग क्र.-१२ मधील कुंभार गल्ली-गोरोबा काका गल्ली, ब्राह्मण गल्ली- जगदंब गल्ली, मल्लावपुरा- सावता गल्ली, प्रभाग क्र. १३ मधील भिल्ल गल्ली भीमनगर-एकलव्यनगर, प्रभाग क्र. १६- मांगवाडा- मुक्ताईनगर, चांभारवाडा- संत रोहिदास गल्ली, भंगीवाडा- वाल्मिकीनगर, प्रभाग क्र. १८- बौद्धवाडा- सारनाथ गल्ली, प्रभाग क्र.२२- मोमीनपुरा-सुलतानपुरा, प्रभाग क्र.२३- धोबीघाट- संत गाडगेबाबा धोबीघाट, प्रभाग क्र. ४६- तेलंगवाडा-बिरसा मुंडा मोहल्ला, गवळीपुरा-विकासपूर, प्रभाग क्र. ४८- कुंभारवाडा-तुळशीबाग, जोहरीवाडा-पारसनगर, रंगार गल्ली- हिंगलाजनगर, प्रभाग क्र. ४९ माळीवाडा- सावतानगर, प्रभाग क्र. ५१-भोईवाडा- गंगापुत्र कॉलनी, पारधीपुरा-जीवकनगर, प्रभाग क्र. ५३-बौद्धवाडा (पैठणगेट)-किरणनगर, प्रभाग क्र.६७- कैकाडीवाडा-शाश्वतनगर, प्रभाग क्र.६८-भोईवाडा-उदय कॉलनी, प्रभाग क्र.७ गोंधळीवाडा-जगदंबा नगर, प्रभाग क्र.१- धनगर गल्ली-होळकरनगर, कैकाडी गल्ली- जाधववाडा, चांभारगल्ली- एकतानगर, प्रभाग क्र.२- ब्राह्मणगल्ली-उन्नतीनगर, मांगवाडा- लहुजीनगर, सोनारगल्ली-प्रेरणानगर, प्रभाग क्र. ८९- धनगरवाडा-अहिल्याबाई होळकरनगर, साठेनगर- अण्णा भाऊ साठे नगर, बौद्धवाडा- गौतम बौद्धनगर, सुतारवाडा-अयोध्यानगर, माळी गल्ली- महात्मा फुलेनगर, कुंभारवाडा - संत गोरोबानगर, तेली गल्ली- अमृतनगर, ब्राह्मणगल्ली-परशुराम नगर, चांभारवाडा- संत रोहिदास नगर, प्रभाग क्र. ८८- कुरेशी मोहल्ला- सय्यद सादात मोहल्ला, प्रभाग क्र. ११३-वैदुवाडा- जयदुर्गानगर, प्रभाग क्र. ७०-मोची मोहल्ला- बाबा रामदेवनगर याप्रमाणे वसाहतींची नावे बदलण्यात आली आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका