शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ट्युशनची मुले गुंडगिरीकडे; छत्रपती संभाजीनगरमध्ये ५० विद्यार्थ्यांची तुंबळ हाणामारी

By सुमित डोळे | Updated: May 9, 2024 15:52 IST

काही दिवासांपूर्वीच खुलेआम काढले होते शस्त्र

छत्रपती संभाजीनगर : ट्युशनसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाठ्या-काठ्या, बेल्टसह तुंबळ हाणामारी करून एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना एन-१ मध्ये घडली. महावितरण कार्यालयाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या ट्युशनचे ४० ते ५० विद्यार्थी व अन्य टवाळखोरांमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. आरडाओरडा व दगडफेकीमुळे स्थानिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही दिवसांपूर्वी याच विद्यार्थ्यांच्या भांडणातून थेट चाकू काढले गेले. मात्र, ट्युशनच्या संचालकांकडून किंवा पोलिसांकडून याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजेच्या सुमारास महावितरण कार्यालयासमोरील एका खासगी क्लासेसचे काही विद्यार्थी गणवेशात मॉस्को कॉर्नर परिसरात जमा झाले होते. थोड्याच वेळात काही बाहेरील टवाळखोरही तेथे दाखल झाले. एकमेकांना मोठमोठ्याने शिवीगाळ सुरू करून त्यांच्यात तुंबळ हाणामारी सुरू झाली. लाठ्या-काठ्यांसह एकमेकांना ते बेल्टने मारहाण करीत होते. त्यातील काहींनी एकमेकांना दगड फेकून मारण्यास सुरुवात केल्याने नागरिक घराबाहेर आले. यातील काही दगड नागरिकांच्याही घरावर गेले. स्थानिक मोठ्या प्रमाणात जमा झाल्यानंतर मात्र सर्वांनी पोबारा केला.

वाद, हाणामाऱ्यांची पार्श्वभूमीच; शस्त्रही उपसलेकाही दिवसांपूर्वीच ट्युशनचे विद्यार्थी व बाहेरील टवाळखोरांमध्ये ट्युशनच्या समोरच हाणामारी होऊन थेट चाकू काढले गेले होते. स्थानिकांनी याचे मोबाइलमध्ये चित्रण करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना धमकावण्यातदेखील आले. काही महिन्यांपूर्वीच याच ट्युशनसंबंधित एका विद्यार्थिनीच्या वादातून दोन मुलांचे अपहरण करून मारहाण व विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, बुधवारच्या घटनेत रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी