शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर विश्वास, पण दगाफटका होऊ शकतो - मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 07:09 IST

जरांगे पाटील म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी  आहे, आम्हाला संपूर्ण ऑपरेशन करून या आजारावर कायमस्वरूपी उपाय  हवा आहे, ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी  आहे. 

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने  मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढवून घेतली. या कालावधीत सरकार आम्हाला आरक्षण देईल, असा विश्वास आहे. पण, दगाफटका होऊ शकतो, हे गृहीत धरून आम्ही गाफील न राहता प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.  जरांगे पाटील म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी  आहे, आम्हाला संपूर्ण ऑपरेशन करून या आजारावर कायमस्वरूपी उपाय  हवा आहे, ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी  आहे. 

१ डिसेंबरपासून विदर्भ व कोकणात संवाद दौरा जरांगे पाटील यांच्या पहिल्या टप्प्यातील संवाद दौऱ्याला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणी लाखोंच्या सभा झाल्या.जरांगे पाटील यांनी शासनाला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली असल्याने १ डिसेंबरपासून ते आता विदर्भ आणि कोकणात संवाद दौरा करणार आहेत.

मी जरांगेंना भेटणार नाही : भुजबळ   मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी जाणार नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केले. जरांगे यांनी भुजबळ यांना टीकेचे लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जरांगे यांची भेट घेणार काय, या प्रश्नावर भुजबळ यांनी नकारार्थी उत्तर दिले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण