शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

ट्रक चालकाची क्रूर हत्या करून टुलबॉक्समध्ये लपवला मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने आले उघडकीस

By सुमित डोळे | Updated: January 22, 2025 16:36 IST

अहिल्यानगरच्या ट्रक चालकाचा छत्रपती संभाजीनगरात आढळला मृतदेह

छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर येथील केडगावमधील ट्रक चालक-मालक असलेले विजय मुरलीधर राऊत (५२) यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरलगत जाणाऱ्या धुळे-सोलापूर या महामार्गावरील झाल्टा परिसरातील उभ्या ट्रकमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता चालकाच्या सीट मागील टुलबॉक्समध्ये राऊत यांचा मृतदेह आढळून आला. आज, बुधवारी पहाटे ५ वाजता ही घटना उघडकीस आली. 

मागील तीस वर्षांपासून राऊत ट्रक व्यवसायात आहेत. चालक ठेवण्याऐवजी ते स्वत:च ट्रक चालवून मालाची नेआण करत. सहा दिवसांपूर्वी ते मध्यप्रदेशच्या रायपुर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये माल पोहोचवण्यासाठी एकटेच गेले होते. तेथून त्यांना अहिल्यानगरसाठी लोखंडी सळ्या पोहोचवण्याचे कंत्राट मिळाले. त्यामुळे रविवारी ते तेथून माल घेऊन निघाले. मंगळवारी मध्यरात्री मात्र त्यांच्या संघटनेच्या एका ट्रक चालकाला राऊत यांचा ट्रक (एम एच १७ - बीडी - ५१६६) छत्रपती संभाजीनगरलगत जाणाऱ्या धुळे-सोलापूर या महामार्गावरील झाल्टा परिसरात उभा दिसला. त्याने गावाकडील अन्य संघटनेच्या सदस्यांना तत्काळ ही बाब कळवली. संघटनेच्या सदस्यांनी शहरातील काही ट्रक व्यवसायिकांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. ते मध्यरात्री २ वाजता आडगाव परिसरात पोहोचले. ट्रकमधून मात्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. चालकाच्या कॅबिनमधूनच दुर्गंधी येत असल्याने त्यांनी टुलबॉक्स उघडला. तेव्हा टुलबॉक्समध्ये राऊत यांच्या चेहऱ्यावर क्रुर पध्दतीने वार करुन हत्या केलेला फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढल्याने सर्वांना धक्काच बसला.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची धाव, संशयितांची चौकशी सुरू राऊत यांची हत्या नेमकी कुठे झाली, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. मारेकऱ्याने त्यांची दुसरीकडे हत्या केली असावी. त्यानंतर टुलबॉक्समध्ये मृतदेह लपवून ट्रक झाल्टा परिसरात आणून उभा केल्याचा दाट संशय आहे. जिल्ह्याचे उपअधीक्षक सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतिष वाघ, चिकलठाण्याचे उपनिरीक्षक सतिष पंडित यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दुपारपर्यंत घाटी रुग्णालयात राऊत यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीAhilyanagarअहिल्यानगर