शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चालकाची हत्या, आरोपी ट्रकमध्ये मृतदेह घेऊन २ दिवस फिरले; प्रेयसीला कॉल केला अन् अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:10 IST

अडीच हजार किलो लाेखंड लुटण्यासाठी ट्रक व्यावसायिकाची हत्या, ग्राहक न मिळाल्याने ट्रक सोडून पसार; पोलिसांनी चोवीस तासांत तीन मारेकऱ्यांना केली अटक

छत्रपती संभाजीनगर : ट्रक व्यावसायिक विजय मुरलीधर राऊत (५२, रा. केडगाव, अहिल्यानगर) यांची हत्या लुटमारीच्या उद्देशातूनच झाली. त्यांच्या परिचयाचा गणेश वसंत पवार याने मित्र गणेश गजानन कुटे (दोघेही रा. सुलतानपूर) व ज्ञानेश्वर गणेश घायाळ (रा. गायखेडा, लोणार) यांच्या मदतीने ही हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखेने चोवीस तासांत हत्येचा उलगडा करत तिघांनाही अटक केली.

राऊत रायपूरला माल पोहोचविण्यासाठी गेले होते. १९ जानेवारी रोजी पुन्हा अडीच हजार किलो लोखंड घेऊन अहिल्यानगरसाठी निघाले. बुधवारी पहाटे मात्र आडगावमध्ये सोलापूर-धुळे महामार्गावर त्यांचा ट्रकच्या टुलबॉक्समध्ये मृतदेह आढळून आला. अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक पूजा नांगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुधीर मोटे, समाधान पवार, रवी लोखंडे, श्रीमंत भालेराव, लहू थोटे, नरेंद्र खंदारे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांचे पथक तत्काळ तपासासाठी रवाना झाले.

कर्जबाजारी, नशेसाठी पैसे पुरेनाबदली चालक असलेल्या पवार व राऊत यांची कामानिमित्ताने अनेकदा भेट होत असे. रायपूरमध्ये त्याने राऊत यांना जवळपास अडीच हजार किलो लोखंडाच्या ट्रान्सपोर्टचे काम मिळाल्याचे पाहिले. कर्जबाजारीपणा, नशेखोरीसाठी पैसे मिळत नसल्याने तेथेच त्याच्या डोक्यात लुटण्याचा कट शिजला.

रूम फ्रेशनर मारून ट्रक चालवलारायपूरमध्येच पवारने राऊत यांना मेहकरपर्यंत सोडण्याची विनंती केली. सोमवारी सकाळी १० वाजता दोघांनी कारंजात नाष्टा केला. राऊत यांना आराम करण्यास सांगून त्याने स्टिअरिंग हाती घेतले. तासाभराने राऊत झोपले असतानाच त्याने टॉमीने डोके ठेचून हत्या केली. मेहकरपासून घायाळ व कुटे त्याला मिळाले. तेथे त्यांनी ३० हजारांत ३ क्विंटल सळ्या विकल्या. जालन्यात त्यांना प्रयत्न करूनही खरेदीदार भेटला नाही. गाडीत दुर्गंधी सुटल्याने रूम फ्रेशनर मारत शहरात येऊन ट्रक सोडून ते गावाकडे परतले.

प्रेयसीला कॉल केला अन् अडकलाप्रवासात पवारचा मोबाइल बंद पडला होता. राऊत यांची हत्या केल्यानंतर त्याने प्रेयसीला संपर्क करण्यासाठी तब्बल ११ वेळा कॉल केले. पोलिस तपासात ही बाब निष्पन्न होताच तपासाची चक्रे प्रथम सदर महिला व नंतर पवारच्या दिशेने फिरले. टोलनाक्याच्या फुटेजमध्येही पवार स्पष्टपणे कैद झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर