शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडाच्या लक्झरी बसची ट्रकला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:03 IST

३० जण जखमी : नागपूर -मुंबई महामार्गावरील दुर्घटना; जखमी जिंतूर तालुक्यातील

वैजापूर : लग्नाचे वºहाड घेऊन जाणाऱ्या लक्झरी बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन ३० जण जखमी झाले. यात १३ महिलांचा समावेश असून ट्रकचालकही गंभीर जखमी आहे. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नागपूर -मुंबई महामार्गावरील तिडी गावाजवळ घडली. वºहाडातील ३० जखमी जिंतूर तालुक्यातील रहिवासी आहेत.मद्यधुंद टेम्पोचालकाने दहा ते बारा जणांना जखमी केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी मद्यधुंद लक्झरी बसचालकाने लग्नाच्या वºहाडाचा जीव धोक्यात घातला. जखमींवर वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन काहींना सुटी देण्यात आली तर काहींना पुढील उपचारासाठी नाशिकला पाठविण्यात आले. अपघात झाल्यानंतर बसचालक फरार झाला.जिंतूर तालुक्यातील कावी येथून लग्नाचे वºहाड घेऊन लक्झरी बस (एमएच २२ एफ २२२१) नाशिककडे निघाली होती. तिडी गावाजवळ आल्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या बस चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने औरंगाबादच्या दिशेने जाणाºया ट्रकला (एमएच १८ सी ७६५२) या बसची जोराची धडक बसली. या धडकेत ट्रकच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला. अपघात झाल्यानंतर बस चालकाने धूम ठोकली. मात्र नागरिकांनी क्लिनरला चोप देण्यास सुरुवात केली. बसचालकासोबतच क्लिनरनेसुद्धा दारु पिली होती, असे येथील नागरिकांनी सांगितले.वैजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि. रामहरी जाधव, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यासह अन्य पोलिसांनी घटधास्थळी धाव घेतली. क्लिनरला नागरिकांच्या तावडीतून सोडवून जखमींना ताबडतोब वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. मुंढे व डॉ. काथार यांनी प्रथमोपचार केले. ट्रकचालक विकास त्र्यंबक तांबे (५०, रा. नाशिक) यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.जखमींची नावेचंद्रकला विठ्ठल शिंदे (४०), पेरुबाई सखा पवार (६५), लताबाई गंगाराम शिंदे (४५), गंगूबाई बाबूराव शिंदे (६०), शांताबाई अप्पा शिंदे (६५), सखा मारुती पवार (६५), राहुल अप्पा शिंदे (१८), दीपक विलास फुलारे (१०), लक्ष्मण सखा पवार (३२), फुलाबाई साहेबराव गुंजाळ (४०), पांडुरंग सावळा शिंदे (४०), चंदू सुखदेव शिंदे (३२), गंगाराम गोविंदा शिंदे (६५), अरुण भुजंग शिंदे (१३), मुकुंदा सावळा पवार (७०), प्रकाश गोविंद पवार (४०), जयंत तुळशीराम पवार (४), तुळशीराम मुकुंदा पवार (४५), यशोदा पांडुरंग शिंदे (४०), मंगल प्रकाश शिंदे (३०), गयाबाई सुखदेव शिंदे (७०), किशोर संतोष पवार (१६), गंगाबाई विठ्ठल पवार (३०), संतोष मुकिंदा पवार (५०), लिलाबाई शंकर शिंदे (४५), वैष्णवी विलास फुलारे (१०), फुलाबाई तुळशीराम पवार (३५, सर्व रा. कावी ता. जिंतूर), गोपी शंकर अजाबे (५६, रा. वैतरणा, नाशिक), राजू रामराव शेटे (३८, रा. हिवरखेडा, जिंतूर). 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस