शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या सावत्र बापाला तिहेरी जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 14:27 IST

अन्य कायद्यांखालीही सश्रम कारावास आणि दंड

औरंगाबाद : धमकी देत दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलीसोबत वारंवार तोंड काळे करणारा तिचा सावत्र बाप कामेश जगन मते याला विशेष न्यायाधीश (पोक्सो) ए. एस. खडसे यांनी ‘पोक्सो’ कायद्याच्या विविध तीन कलमांखाली प्रत्येकी जन्मठेप (तिहेरी) आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. त्याचप्रमाणे न्यायालयाने विविध कायद्यांखाली आरोपीला विविध कालावधींचा सश्रम कारावास आणि दंड ठोठावला. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. पीडितेला भरपाई मिळावी, यासाठी न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे शिफारस केली आहे.

१७ वर्षीय पीडित युवतीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिने तिच्या पतीला दोन वर्षांपासून सोडून दिले असून, सध्या ती पीडित मुलगी व मुलासोबत राहते. एक दिवस कामेशने मुलीवर अत्याचार केला व याची वाच्यता केल्यास तिला आणि तिच्या भावाला घरातून हाकलून देण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून मुलीने ही घटना कोणालाही सांगितली नाही. नेमका याचाच फायदा घेत मुलगी एकटी असताना तो दोन वर्षे धमक्या देऊन तिच्यावर अत्याचार करत होता. या त्रासाला कंटाळून मुलीने मागील दाेन वर्षांची आपबीती आईला सांगितली. त्यानंतर दोघींनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस. के. खटाणे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.

सुनावणी आणि शिक्षाखटल्याच्या सुनावणीवेळी अतिरिक्त लोकअभियोक्ता अरविंद पी. बागूल यांनी पीडिता आणि तिच्या आईसह पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. पैरवी अधिकारी म्हणून कायंदे आणि रामदास सुरे यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपी कामेशला ‘पोक्सो’च्या कलम ४, ५(१) आणि ५(एन) सह ६ अन्वये प्रत्येकी जन्मठेप आणि एक हजार रुपये दंड, याच कायद्याच्या कलम ८ अन्वये ७ वर्षे, कलम ९ (१) आणि ९(एन) अन्वये प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५०० रुपये दंड, भादंवि कलम ५०६ नुसार दोन वर्षे सश्रम कारावास आणि बाल न्याय (बालकांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या कलम ७५ नुसार ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड ठोठावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी