शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराचा काळोख केव्हा होणार दूर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:12 IST

मेणबत्त्या पेटवून हिंगणघाट येथील मृत तरुणीस श्रद्धांजली

ठळक मुद्दे३० दिवसांच्या आत आरोपीला  शिक्षेची मागणीसंतप्त युवती, महिलांचा सवाल 

औरंगाबाद : तिला श्रद्धांजली अर्पण करताना काही जण नि:शब्द होते, तर काही जणांच्या भावना अनावर होत होत्या. अनेकांनी संताप व्यक्त केला. मेणबत्त्या पेटवून क्षणभर अंधार दूर होईल, पण अत्याचाराच्या स्वरुपात महिलांवर निर्माण झालेला खरा काळोख कधी दूर होणार? अमानवी प्रवृत्तीने बळी घेतलेल्या हिंगणघाटच्या  पीडितेला श्रद्धांजली अर्पण करताना सोमवारी शहरात श्रद्धांजली सभेप्रसंगी महिला, युवतींसह तरुणांनी हा प्रश्न उपस्थित केला. 

हिंगणघाट येथे पेटविण्यात आलेल्या युवतीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. सोमवारी तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेचा निषेध करीत शहरातील विविध भागांमध्ये मेणबत्त्या पेटवून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. पैठणगेट येथील स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्याच्या परिसरात सजग महिला संघर्ष समितीतर्फे श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा, डॉ. रश्मी बोरीकर, मंगल खिंवसरा, पद्मा तापडिया,  सुजाता पाठक, सुनीता जाधव, डॉ. मंजूषा शेरकर, हेमलता सोनटक्के, प्रतीक खडतकर, समीर देवकर, नितीन जोगदंड, संतोष सुरासे, पवन आडे, अर्जुन भूमकर, अतुल वाघमारे, प्रकाश हराळ, ओमकार आंबेकर, समाधान सोरमारे, नीलेश चौधरी, सागर इंगळे, असीम बेग, सीमा जिवरग, हेमलता सोनटक्के आदींसह युवक-युवतींची उपस्थिती लक्षणीय होती.

डॉ. रश्मी बोरीकर म्हणाल्या, आरोपीला ३० दिवसांच्या आत कठोर शिक्षा झाली पाहिजे. कायद्यावर विश्वास आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच ही शिक्षा झाली पाहिजे. मंगल खिंवसरा म्हणाल्या, शासन, पोलीस प्रशासन आणि न्यायालयाची लोकांमध्ये असलेली प्रतिमा बदलली पाहिजे. आरोपीला कठोर शिक्षा झाली तरच आदरयुक्त भीती निर्माण होईल.

शिक्षण क्षेत्रातील संघटनांतर्फे श्रद्धांजलीक्रांतीचौक येथे शिक्षण क्षेत्रातील संघटनांतर्फे  औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठतर्फे मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. आरोपीला लवकरात लवकर मृत्युदंडाची शिक्षा व्हावी व अशा घटना भविष्यात घडू नये, कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी शिक्षक क्रांतीचे प्रा. मनोज पाटील, आनंद खरात, पांडुरंग गोकुंडे, मुख्याध्यापक संघाचे युनूस पटेल, मनोहर सुरगुडे, भास्कर म्हस्के, नालमवार, अवद चाऊस, देवानंद वानखेडे, सुदर्शन पवार, नामदेव थोटे, शिरीष जाधव, भगवान पाटील, सचिन मिसाळ, प्रदीप विखे, प्रल्हाद शिंदे, संतोष जाधव, सुरेखा शिंदे, संध्या काळकर, सुरेखा शिंदे, संभाजी काळे, विजय नागरे, किशोर  चव्हाण, सुनील औटे आदी उपस्थित होते.

यासाठी स्वातंत्र्य मिळविले?स्वातंत्र्यसैनिक म्हणून या घटनेचा निषेध व्यक्त क रते. परंतु आम्ही हे पाहण्यासाठी स्वातंत्र्य मिळविले का, यासाठीच आम्ही धडपड केली का, असा प्रश्न निर्माण होत आहे. - ताराबाई लड्डा, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी 

आजही भीती वाटतेआरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आजही घराबाहेर एकटे जात असताना भीती वाटते. भीतीच्या वातावरणाची ही परिस्थिती कधी बदलणार, असा प्रश्न आहे. - हेमलता सोनटक्के

टॅग्स :WomenमहिलाDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद