शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

मराठवाड्यातील दुष्काळी भागात आढळला ‘ट्री फ्रॉग’

By | Updated: December 6, 2020 04:00 IST

जतन आवश्यक : परिसरातील पर्यावरणीय मूल्य चांगले पुणे : चांगले पर्यावरण असलेल्या ठिकाणी झाडावरील बेडूक ‘ट्री फ्रॉग’ (पॉलीपेडेटस्‌ मॅकुलॅटस ...

जतन आवश्यक : परिसरातील पर्यावरणीय मूल्य चांगले

पुणे : चांगले पर्यावरण असलेल्या ठिकाणी झाडावरील बेडूक ‘ट्री फ्रॉग’ (पॉलीपेडेटस्‌ मॅकुलॅटस प्रजाती) पाहायला मिळतो. हा बेडूक आडस (ता. केज, जि. बीड) या ठिकाणी आढळून आला आहे. त्यामुळे या परिसरातील पर्यावरणीय मूल्य चांगले असून, या बेडकाचे जतन आवश्यक आहे. मानवाला उपद्रवी किडे, कीटक हा बेडूक फस्त करतो. म्हणून तो मानवासाठी उपयुक्त ठरणारा आहे. यापूर्वी कोकणातच हा बेडूक दिसत असल्याची नोंद आहे.

झाडावरील बेडकाची प्रथम १८३० मध्ये जॅान ॲडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली. दक्षिण आशियामध्ये हा बेडूक दिसून येतो. कोकणात आंबोली परिसरात दिसतो, तर मराठवाड्यात हा क्वचित दिसून येतो. आतापर्यंत कोणाला दिसल्याची माहिती उपलब्ध नाही. या बेडकाला ‘चुनाम’ असेही नाव आहे. हा तामिळ शब्द आहे, तर संस्कृतमध्ये ‘चुर्ण’ म्हटले जाते. भिंतीवरदेखील हा बेडूक दिसतो. जंगलात किंवा एखाद्या ठिकाणी झाड आणि ओलावा असेल तर गावातही आढळून येतात. आंबोली तालुक्यात उडता बेडूक आढळतो. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो.

झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट, थाळीसारखा झालेला असतो. बेडकांच्या डोळ्यातील बाहुल्या आकाराने आडव्या असतात, तसेच या बेडकांच्या पायावर आतील बाजूस भडक रंगाचे पट्टे असतात, जे बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात. या भडक रंगाचा वापर करून बेडूक आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वत:चा बचाव करतात. झाडावरच्या बेडकांची शक्ती लांब उड्या मारण्यातच सामावलेली असते.

-----------------------------------बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे. कीटक, किडे हे यांचे खाद्य असून, ते शेतकऱ्यांना उपयोगी ठरतात. यांना ‘चुनाम’ असेही म्हणतात. हा तामिळ शब्द आहे. हा भिंतीवर सहसा दिसून येतो. जंगलात मोठ्या प्रमाणावर दिसतात.

- डॉ. के. पी. दिनेश, प्राणिसंशोधक, भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था, पुणे.