शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाळेत पाणी आणण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 19:28 IST

शहर परिसरातील जवळपास ३ लाख विद्यार्थी झाडाला पाणी देतील

औरंगाबाद : महाराष्ट्र दिन अर्थात १ मे रोजी शाळांमध्ये वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्या दिवशी झेंडावंदन व निकाल दाखविण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शाळा परिसरातील झाडांना पाणी देण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांना सोबत पाण्याची बाटली आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या दिवशी शहर परिसरातील जवळपास ३ लाख विद्यार्थी झाडाला पाणी देतील व ‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ या उपक्रमाची सुरुवात होईल, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले.

एका दिवशी पाणी दिल्याने झाडे वाचतील का, असा प्रश्न केला असता शिक्षणाधिकारी जैस्वाल म्हणाले, झाडे जगली पाहिजेत, त्यासाठी झाडांना पाणी दिले पाहिजे, हे संस्कार मुलांवर रुजावेत हा यामागचा हेतू आहे. विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार १ मे रोजी शाळांमध्ये ‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. १५ जूननंतर नियमित शाळा उघडतील. तेव्हा प्रामुख्याने शहर व परिसरातील सर्व माध्यमांच्या, सर्व मंडळांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यादृष्टीने काही शाळांमध्ये भेटी देऊन या उपक्रमाबद्दल जागृती करण्यात आली. 

शाळांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ३ लाख मुले व शिक्षक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. शाळांमध्ये ‘ग्रीन औरंगाबाद, ग्रीन स्कूल’ ही संकल्पना रुजवायची आहे. शाळा परिसरातील झाडे जगवायची आहेत व ती वाढवायची आहेत. ज्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल व पर्जन्यमान वाढीस मदत होईल. 

पर्यावरणाचे संतुलन राखावेच लागेलपर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पूर्वपदावर आणण्याची नैसर्गिक क्षमता वृक्षांमध्ये आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे. च्निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल, तर झाडे लावणे व ती जगविणे गरजेचे आहे. त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असे शिक्षणाधिकारी जैस्वाल म्हणाले. १५ जूननंतर प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक हे आपापल्या शाळेतील एक झाड दत्तक घेतील. पाण्याच्या बाटलीमध्ये सुतळी टाकून तिचे दुसरे टोक झाडाच्या मुळाशी बुजविले जाईल. त्यामुळे किमान ७ दिवस बाटलीतील पाणी झाडांना मिळेल. हे पाणी झाडाच्या मुळाशी किमान २१ दिवस ओलावा ठेवते. ज्यामुळे झाडे वाढतील व पर्यावरणास मदत होईल, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 

टॅग्स :WaterपाणीNatureनिसर्गAurangabadऔरंगाबाद