शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ३२ हजार कर्करोग रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:16 IST

राज्य कर्करोग संस्थेत वर्षभरात तब्बल ३२ हजार ५१९ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले,

औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेत वर्षभरात तब्बल ३२ हजार ५१९ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले, तर आंतररुग्ण विभागात ४ हजार ४२८ जणांवर उपचार झाले. राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा आणि वर्षभरात मिळालेल्या सुविधांमुळे रुग्णसेवेत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे.

सरत्या वर्षाच्या प्रारंभी कर्करोग रुग्णालयात पॅलेटिव्ह के अर बाह्यरुग्ण विभागाचे उद््घाटन झाले. कर्करोगाचे रुग्ण स्टेज चारला गेल्यानंतर सदर रुग्णाला रुग्णालयात दाखल न करताही घरच्या घरी कशाप्रकारे काळजी घ्यावी, यादृष्टीने पॅलेटिव्ह के अर ओपीडी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

कर्करोग रुग्णालयाला शासनाकडून राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. ११ फेब्रुवारीला राज्य कर्करोग संस्थेच्या भूमिपूजनासह भाभाट्रॉन-२ चे उद्घाटन झाले. भाभाट्रॉन-२ या यंत्रामुळे कर्करुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होण्यास मोठी मदत झाली. वर्षभरात लिनिअर अ‍ॅक्सलरेटरद्वारे ८९५ रुग्णांना एकूण २२ हजार ३७५, तर कोबाल्टद्वारे ५१ रुग्णांना एकूण १ हजार २७५ किरणोपचार देण्यात आले.रुग्णालयात मार्च महिन्यात बालरोग विभागात केमोथेरपीसाठी डे-केअर आणि त्यानंतर आंतररुग्ण वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला. राज्य कर्करोग संस्थेच्या दर्जामुळे विविध विभागांसाठी ३६२ पदांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. रुग्णालयाचा होणारा विस्तार आणि दाखल, अद्ययावत यंत्रे, यामुळे रुग्णालय आगामी कालावधीत आणखी सुसज्ज होईल आणि रुग्णसेवेत वाढ होईल.

६ वर्षांत अडीच लाखांवर रुग्णरुग्णालयात २०१८ मध्ये तब्बल ९८० मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या, तर ६१० लहान शस्त्रक्रिया झाल्या. शस्त्रक्रिया आणि उपचारामुळे रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. गेल्या ६ वर्षांत अडीच लाखांवर रुग्णांवर उपचार करण्यात आले.

महिनाभरात बांधकामशासकीय कर्करोग रुग्णालयाची अतिशय चांगली वाटचाल सुरू आहे. राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला. त्याचा निधीदेखील आला आहे. आगामी महिनाभरात बांधकाम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने आर्किटेक्टचे नियोजन झालेले आहे.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

आणखी सुसज्जरुग्णालयाच्या विकासाच्या दृष्टीने सरते वर्ष चांगले राहिले. यंत्रसामग्री दाखल होत आहे. बांधकामासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. आगामी कालावधीत रुग्णालय आणखी चांगले आणि सुसज्ज होईल.- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्यअधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद