शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल यंत्रणा भेदून थेट प्लॅटफॉर्मवर धडकलेल्या रेल्वे इंजिनने चुकविला काळजाचा ठोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:19 IST

हे इंजिन ८० कि.मी.च्या वेगाने सर्व सिग्नल यंत्रणा भेदून थेट रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबले

ठळक मुद्देब्रेक नादुरुस्त झाल्याने सिग्नल तोडलेचिकलठाणा ते रेल्वेस्टेशनदरम्यान मोठी दुर्घटना टळली

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद : रेल्वे रुळावरून ८० कि.मी.च्या वेगाने धडधडत धावणारे रेल्वे इंजिन आवाज करीत प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येऊन थांबल्याची काळजाचा ठोका चुकविणारी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. 

चिकलठाणाहून निघाल्यानंतर रेल्वे इंजिन सर्व सिग्नल यंत्रणा तोडून थेट औरंगाबाद स्टेशनवर धाडकन येऊन थांबले. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ब्रेक नादुरुस्तीतून ही घटना घडल्याचे समजते; परंतु घटनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात येत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे इंजिन नादुरुस्त होण्याच्या घटना नवीन नाहीत. इंजिन नादुरुस्तीच्या घटनांमुळे वारंवार प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. नांदेड विभागातील रेल्वे जुन्या इंजिनवरच धावत असल्याची ओरड होते. या घटनेने रेल्वे अधिकाऱ्यांचा थरकाप उडाला. मालगाडीसाठी औरंगाबादला ४ जानेवारी रोजी कोडी येथून एक इंजिन दाखल होत होते. हे इंजिन चिकलठाणा रेल्वेस्टेशनपर्यंत सुरळीतपणे पोहोचले. त्यानंतर औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पोहोचेपर्यंत काहीतरी वेगळे घडेल, याची रेल्वे अधिकाऱ्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.

चिकलठाणाहून येणारे रेल्वेचे इंजिन दुपारी ४ वाजेच्या सुमारास सर्व सिग्नल यंत्रणा भेदून थेट रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर खर्रर्र असा आवाज करीत येऊन थांबले. ८० कि.मी.च्या वेगाने धावणाऱ्या इंजिनच्या या घटनेने एकच धावपळ झाली. क्षणभर रेल्वे अधिकाऱ्यांनाही कळले नाही की, नेमके काय झाले. कोणी म्हणत होते चालकाने सिग्नल यंत्रणेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून इंजिन प्लॅटफॉर्मवर आणले. यासंदर्भात प्राथमिक चौकशी केली असता ब्रेक नादुरुस्त झाल्याने हा प्रकार घडला. चालकाने वेळीच आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकशी सुरू आहे या घटनेत रेल्वे इंजिनचे ब्रेक नादुरुस्त झाले होते, की अन्य काही कारण आहे, इंजिन चालक दोषी आहे का, याची दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर इंजिन औरंगाबादलाच ठेवण्यात आले, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. या घटनेविषयी अधिक माहिती घेतली जाईल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनAccidentअपघात